agriculture news in marathi, Monsoon Adavance in South sea of Kerala | Agrowon

मॉन्सून देशाच्या उंबरठ्यावर..! केरळच्या दक्षिण समुद्राचा भाग व्यापला...
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018

पुणे ः मॉन्सूनने भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोमोरिन भागात आज (ता. २८) प्रगती केली आहे. केरळ  दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता.२७) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. आज (ता. २८) अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. 

पुणे ः मॉन्सूनने भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोमोरिन भागात आज (ता. २८) प्रगती केली आहे. केरळ  दक्षिणेस आणि देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी (ता.२७) श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. आज (ता. २८) अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. 

मॉन्सूनने शुक्रवारी (ता. २५) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. रविवारी मॉन्सूनने अंदमान बेटांवरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा पार केला होतो. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरीन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. रविवारपर्यंत मालदीव-कोमोरीनचा संपूर्ण भाग, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत माॅन्सून पोचण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. ३०) मॉन्सून केरळात दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र
केरळ-कर्नाटकच्या किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात रविवारी (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते सोमवारीही कायम आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ‘मेकुणू’ वादळ निवळून गेले असून, सौदी अरेबिया आणि परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय होते.

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...