agriculture news in marathi, Monsoon advanced in Andaman | Agrowon

Breaking : मॉन्सून अंदमानात दाखल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 मे 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वीच दुष्काळाने होरपळणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) ६ जूनला केरळात आगमन होण्याचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. अंदमान निकोबार बेटसमूहावर १८ किंवा १९ मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत दिले होते. यंदा सहा दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, केरळातील आगमनानंतर मॉन्सूनची देशातील पुढील वाटचाल ठरणार आहे.

‘आयएमडी’ने मॉन्सूनच्या आगमनाचे पूर्वानुमान बुधवारी (ता. १५) जाहीर केले. देवभूमी केरळात ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, पूर्वानुमानानुसार आगमन अंदाजाच्या ४ दिवस अगोदर किंवा नंतर होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणतः २० मे जवळपास अंदमान समुद्र आणि बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. तर १ जूनला केरळमधून मॉन्सूनचे देशात आगमन होते. 

‘आयएमडी’कडून मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचे पूर्वानुमान २००५ पासून वर्तविण्यात येते. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्विपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाची स्थिती, दक्षिण चीन समुद्रातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे, पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरातील हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग हे सहा घटक पूर्वानुमान वर्तविताना विचारात घेतले जातात. 

माॅन्सून आगमन
वर्ष अंदाजित  प्रत्यक्ष
२०१४ ५ जून  ६ जून
२०१५ ३० मे ५ जून
२०१६   ७ जून   ८ जून
२०१७  ३० मे  ३० मे
२०१८  २९ मे २९ मे

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...