मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात मॉन्सून दाखल

मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात मॉन्सून दाखल
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात मॉन्सून दाखल

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे.  शुक्रवारी (ता. २१) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून शनिवारी (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापत, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. यामुळे वाऱ्यांचा वेग तर मंदावलाच तसेच बाष्पही ओढून नेल्याने पाऊसही लांबला. वादळ निवळल्यानंतरही अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन लांबले. केरळमध्ये आठवडाभर उशीराने येणाऱ्या मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पुर्ण केली. २० जून रोजी दक्षिण महाराष्ट्रापर्यंतचा टप्पा गाठला. दोन दिवसांत पुढे प्रगती करत राज्याच्या आणखी भाग व्यापला. सुंपुर्ण पूर्व भारतात मजलमारून आता उत्तरेकडे वाटचाल सुरु केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com