agriculture news in marathi, Monsoon to be active from wednesday in konkan and central maharashtra | Agrowon

बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे : राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी (ता. १) दुपारनंतर विदर्भ वगळता राज्यात सर्वदूर मुख्यत: निरभ्र आकाश होते. बुधवारपर्यंत (ता. ४) राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी (ता. १) दुपारनंतर विदर्भ वगळता राज्यात सर्वदूर मुख्यत: निरभ्र आकाश होते. बुधवारपर्यंत (ता. ४) राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

    दरम्यान, रविवारी (ता.१) गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सावर्डे येथे १७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर असुर्डे, शिरगाव, राजापूर येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्यात मुख्यत: कोरडे हवामान होते.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकला आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या भागापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गोवा, कर्नाटक, केरळच्या किनाऱ्यालगत दाट ढग आहेत. तर अांध्र प्रदेशाच्या उत्तर भागात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने विदर्भात ढग जमा झाले होते.

रविवारी (ता.१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : कोकण : चिपळूण ६५, खेरडी ६२, वाहल ५६, सावर्डे १७७, असुर्डे ११८, कळकवणे ४७, शिरगाव १०५, दापोली ५०, बुरवंडी ३०, दाभोल ५६, माखजन ३२, राजापूर १४०, सवंडल ५४, जैतापूर ३२, मोखडा ४८, खोडला ६५
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ५२, धारगाव ३६, मंगळवेढा ३२, देशिंग २०, आंबा ३९. 
विदर्भ : मोताळा २७, शेंदूर्जन ३०, पेंढरी २२.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...