मॉन्सून एक्सप्रेस कर्नाटकात दाखल !!

agriculture news in marathi, Monsoon enters in Karanataka
agriculture news in marathi, Monsoon enters in Karanataka

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल सुरूच असून, बुधवारी (ता.३०) मॉन्सूनने अरबी समुद्रातून प्रगती करत कर्नाटकात धडक दिली आहे. कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, अंतर्गत कर्नाटकचा काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मॉन्सून सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा तो तीन दिवस आधी केरळात धडकेल, असे हवामान विभागाने आधीच जाहीर केले होते. हा अंदाज अचूक ठरवत माॅन्सून मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सूनने अरबी समुद्र, केरळ, तमिळनाडूसह बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात प्रगती केल्याचे जाहीर करण्यात आले. माॅन्सूनने केरळच्या कर्नुल, तमिळनाडूच्या कोईंबतूर, कोडाईकेनॉल, तुतीकोरीनपर्यंतचा भाग व्यापला आहे. 

गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये केरळमध्ये पाऊस पडत असून, १४ केंद्रांवर ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या भागात पश्‍चिमेकडून तीस नॉट्स वेगाने वारे वाहत असून, दक्षिण अरबी समुद्रावर साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिम किंवा नैर्ऋत्येकडून वारे वाहत असल्याचे दिसून आले आहे. या भागात ढगांची दाटी असून, वातावरणात जाणाऱ्या दीर्घ किरणोत्सारी लहरींच्या स्थितीचा विचार करून मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com