agriculture news in marathi, Monsoon hits Mumbai and Konkan | Agrowon

मुंबईसह कोकण किनारपट्टीत धुवाधार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

पुणे : मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरशः धुऊन काढले आहे. ठाणे, पालघर, रायगडसह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातले आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही धुवाधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचे आगमन झाले आहे. कोकणात अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलाव परिसरात सर्वाधिक ३०० मिलिमीटर पाऊस पडला असून, सिंधुदुर्गमधील देवगड येथे २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

पुणे : मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरशः धुऊन काढले आहे. ठाणे, पालघर, रायगडसह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातले आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही धुवाधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचे आगमन झाले आहे. कोकणात अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलाव परिसरात सर्वाधिक ३०० मिलिमीटर पाऊस पडला असून, सिंधुदुर्गमधील देवगड येथे २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

रविवारपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची जोरदार बरसात सुरू आहे. रात्रभर सुरू असलेला पाऊस सोमवारी दिवसभर मुसळधार कोसळत आहे. पालघर जिल्ह्यात पावसामुळे सूर्या नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी पाणी भरले असून, रस्ते खचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य, पश्‍चिम आणि हर्बर रेल्वलाइनवर पाणी भरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देवगड, सांताक्रूज, डहाणू, तलासरी, ठाणे येथे २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दावडी, शिरगाव, ताम्हिणी, भिरासह घाटमाथ्यावर पावसाची कोसळधार सुरू आहे. नाशिक, पुणे, नगर, सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाने जोर धरला आहे. सोमवारी दुपारनंतर कोकणासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगांची दाटी झाली असून, पावसाची रिपरीप सुरू आहे. 

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधारेची शक्यता
मॉन्सून सक्रिय झाल्याने शुक्रवारपर्यंत (ता. २९) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार अाहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर पाऊस पडणार असून, बुधवार (ता. २७) अाणि गुरुवारी (ता. २८) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - हवामान विभाग) : 

  • कोकण : देवगड २७२, सांताक्रूज २३१, डहाणू २२६, तलासरी २१०, ठाणे २१०, वसई १७३, पेण १६०, पनवेल १५९, कल्याण १५९, माथेरान १५५, विक्रमगड १५३, अलिबाग १५०, भिवंडी १५०, पालघर १४१, उल्हासनगर १३४, जव्हार १३०, तळा १३०, गुहागर ११२, रोहा ११०, शहापूर ११०, अमरनाथ १०७, उरण १०६, म्हसळा १०५, वाडा १०१, कुलाबा ९९, खेड ९४, कर्जत ८६, रत्नागिरी ७७, सुधागडपाली ७७, मुलदे ७५, कणकवली ७४, खालापूर ७१, माणगाव ७०, मंडणगड ७०, चिपळूण ६७, मुरूड ६०, संगमेश्‍वर ६०, वैभववाडी ५७, राजापूर ५६, कुडाळ ५४, हर्णे ५३, मोखडा ५२, लांजा ५१, मुरूड ५१, पोलादपूर ५०, श्रीवर्धन ४४, महाड ३८.  
  •  
  • मध्य महाराष्ट्र : लोणावळा ८१, ओझरखेडा ७७, इगतपुरी ७१, चंदगड ६७, पेठ ४९, महाबळेश्‍वर ४७, गगनबावडा ४३, पाैड ४२, त्र्यंबकेश्‍वर ४१, हर्सूल ३२, राधानगरी ३१. 
  •  
  • घाटमाथा : दावडी २२०, शिरगाव १५०, ताम्हिणी, भिरा प्रत्येकी १३०, आंबोणे १२०, लोणावळा ८०, खोपोली, कोयना, नवजा प्रत्येकी ७०, वळवण ५०, कोयना पोफळी ४०, खंद, भिवपुरी, शिरोटा प्रत्येकी ३०.
  • मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : विहार ३००, तुलसी २५०, वैतरणा ९०, तानसा ८०, अप्पर वैतरणा ४०.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...