मॉन्सून एक्सप्रेस ६ जूनला केरळात, महाराष्ट्रात ११ला

मॉन्सून एक्सप्रेस ६ जूनला केरळात, महाराष्ट्रात ११ला
मॉन्सून एक्सप्रेस ६ जूनला केरळात, महाराष्ट्रात ११ला

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मॉन्सूनचे आगमन सर्वसाधारणच्या तुलनेत काहीसे उशिरा होणार आहे. मॉन्सून ६ जूनला केरळात दाखल होणार असून, यानंतर पाच दिवसांनी (११ जून) महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे केरळात १ जूनला मॉन्सून दाखल होण्याचे संकेत असतात. काही वेळा तो आधी तर काही वेळा नंतरही दाखल होतो. यंदाही मॉन्सून पाच दिवस उशिरा दाखल होईल. यातही चार कमी-अधिक दिवसांची तफावत धरली जाते. आगमन उशिर होण्यात स्थानिक स्थितीतील हवामानातील बदलांचा सतत होणार प्रभाव मॉन्सून मार्ग प्रभावित करत असतो, यामुळे मॉन्सूनच्या निर्धारित तारखेपेक्षा कालावधीत फरक पडतो.  

मॉन्सूनचे आगमन
वर्ष-  अंदाजित आगमन  प्रत्यक्ष आगमन
२०१४ ५ जून ६ जून
२०१५ ३० मे ५ जून
२०१६ ७ जून ८ जून
२०१७ ३० मे ३० मे
२०१८ २९ मे २९ मे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com