पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला

येत्या शनिवार (ता.२६) पर्यंत कोकण, गोवा व विदर्भात बहुतांशी ठिकाणी हलका तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
उपग्रह छायाचित्र वेळ सकाळी ९.४५ वा
उपग्रह छायाचित्र वेळ सकाळी ९.४५ वा

पुणे : राज्याच्या काही भागांत असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरल्यामुळे पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. तरी राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. मंगळवारी (ता.२२) कोकणातील म्हसळा, माणगाव, संगमेश्वर, देवरूख, डहाणू या भागांत व घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्राच्या इगतपुरी, अकोले, मावळ, मुळशी, महाबळेश्वरच्या काही भागांत पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या.  येत्या शनिवार (ता.२६) पर्यंत कोकण, गोवा व विदर्भात बहुतांशी ठिकाणी हलका तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. २५) विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर शनिवारी (ता.२६) कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.  मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील म्हसळा येथे ५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. माणगाव, संगमेश्वर, देवरूख, डहाणू, हर्णै, केपे, वाल्पोई, अलिबाग येथेही हलका पाऊस पडला. तर शिरगाव, वाणगाव, डुंगरवाडी, कोयना, ताम्हिणी या घाटमाथ्यावरही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील राहाता, राहुरी शहरामध्ये ५० मिलिमीटर पाऊस पडला. राधानगरी, आजरा, गारगोटी, कर्जत, शेवगाव, शिरूर, येवला, आंबेगाव येथेही हलका पाऊस पडला. पुणे परिसरातही पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. मराठवाड्याील केज, अंबाजोगाई, कन्नड, गंगाखेड, परळीवैजनाथ येथे हलका पाऊस पडला उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. विदर्भातील मलकापूर, जळगावजामोद, अकोला, बाळापूर, बार्शी येथे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या.   मंगळवारी (ता.२२) सकाळी आठवाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)  कोकण ः म्हसळा ५०, माणगाव, संगमेश्वर, देवरूख ४०, डहाणू, हर्णै, खेड, केपे, वाल्पोई ३०, अलिबाग, भिरा, चिपळूण, गुहागर, मंडणगड, मुंबई, रत्नागिरी, सांगे, शहापूर, सुधागडपाली, उरण, वैभववाडी २०, अंबरनाथ, भिवंडी, देवगड, दोडामार्ग, जव्हार, कल्याण, लांजा, महाड, मडगाव, माथेरान, मुरबाड, मुरूड, पालघर, पेण, पेडणे, पोलादपूर, फोंडा, राजापूर, रोहा, सांकेलिम, श्रीवर्धन, तलासरी, ठाणे, वाडा १०.  मध्य महाराष्ट्र ः राहाता, राहुरी ५०, राधानगरी ३०, आजरा, गारगोटी, गिधाडे, कर्जत, शेवगाव, शिरूर, येवला २०, आंबेगाव, घोडेगाव, चांदवड,  मराठवाडा ः केज २०, अंबाजोगाई, गंगाखेड, कन्नड, परळीवैजनाथ, पाथरी, पूर्णा, सोनपेठ १०.  विदर्भ ः मलकापूर ४०, जळगाव जामोद ३०, अकोला, बाळापूर, बार्शी, टाकळी, नांदुरा २०, बुलडाणा, खामगाव, मालेगाव, मेहकर, मोताळा, संग्रामपूर १०.  घाटमाथा ः शिरगाव, वाणगाव, डुंगरवाडी, कोयना (पोफळी), ताम्हिणी ४०, दावडी, कोयना (नवजा) ३०, भिरा, लोणावळा (टाटा), लोणावळा (आॅफिस),  वळवण २०, धारावी, खोपोली १०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com