agriculture news in marathi, Monsoon onset in east India | Agrowon

पूर्व भारतात माॅन्सूनची चाल
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

पुणे : प्रवाह मंदावल्याने अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही जवळपास १३ दिवस माॅन्सूनची वाटचाल थांबली होती. शनिवारी अरबी समुद्रातून प्रवास सुरू केल्यानंतर सोमवारी (ता. २५) पूर्व भारतातही मॉन्सूनने चाल केली आहे. पश्‍चिम बंगाल व्यापून, बिहार, झारखंड ओडिशाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. पश्‍चिम भागातील गुजरात, मध्य प्रदेशातील मान्सूनची प्रगती मात्र जैसे थे आहे. 

पुणे : प्रवाह मंदावल्याने अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही जवळपास १३ दिवस माॅन्सूनची वाटचाल थांबली होती. शनिवारी अरबी समुद्रातून प्रवास सुरू केल्यानंतर सोमवारी (ता. २५) पूर्व भारतातही मॉन्सूनने चाल केली आहे. पश्‍चिम बंगाल व्यापून, बिहार, झारखंड ओडिशाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. पश्‍चिम भागातील गुजरात, मध्य प्रदेशातील मान्सूनची प्रगती मात्र जैसे थे आहे. 

मेडन जुलियन आॅस्सिलेशनची स्थिती अनुकूल नसल्याने मॉन्सूनचे प्रवाह मंदावले होते. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर माॅन्सूनची वाटचाल झाली नव्हती. त्यामुळे राज्यात पावसानेही उघडीप दिली होती. शनिवारपासून राज्यात मॉन्सूनची प्रगती सुरू झाली. रविवारीही मोठी मुसंडी मारत जवळपास संपूर्ण राज्यासह गुजरातच्या निम्मा, भाग मध्य प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. तर सोमवारी ईशान्य भारतातील सर्व राज्य, सिक्कीम, पश्‍चिम बंगाल व्यापून मॉन्सूनने बिहार, झारखंडमध्ये धडक दिली. ओडिशाच्या आणखी काही भागातही मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधील मॉन्सूनची उत्तर सीमा कायम आहे. 

पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने बुधवारपर्यंत (ता. २७) संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगडसह गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागात माॅन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. २६ जुलैपासून वायव्य भारतातील राज्यांमध्ये वादळी पाऊस सुरू होणार असून, १ जुलैपर्यंत मॉन्सून दिल्लीसह वायव्य भारताच्या काही भागात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये वीज कोसळून पाच जण ठार
कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये सोमवारी (ता.२५) झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यांमुळे वीज कोसळून पाच जण ठार झाले तर एक जण वाहून गेला, अशी माहिती राज्याच्या आपत्ती निवारण अधिकाऱ्याने दिली.पुरुलिआ जिल्ह्यातील भोमरागोरा गावात एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण हे राजेंद्रपुरच्या बसिरहट ब्लॉक दोनमध्ये आणि २४ परगणा जिल्ह्यातील केउतेपारा येथे वीज कोसळल्याने मरण पावले,असे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...