agriculture news in marathi, Monsoon onset on kerala | Agrowon

मॉन्सूनने देशाचा उंबरठा अोलांडला; केरळ व्यापला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (आज) संपूर्ण केरळ व्यापले असून, तर तामिळनाडूच्या काही भागात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी (ता. २८) प्रगती करत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीन भागात धडक दिली होती. बंगालच्या उपसागरातही संपूर्ण अंदमान बेटसमूहासह मोठा पल्ला पार केला आहे. 

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (आज) संपूर्ण केरळ व्यापले असून, तर तामिळनाडूच्या काही भागात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी (ता. २८) प्रगती करत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीन भागात धडक दिली होती. बंगालच्या उपसागरातही संपूर्ण अंदमान बेटसमूहासह मोठा पल्ला पार केला आहे. 

अंदमानात नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने (२५ जून) दाखल झालेल्या माॅन्सूनने वेगाने प्रगती सुरू ठेवली आहे. रविवारी (ता. २७) अंदमान बेटांच्या बहुतांशी भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली तर दुसऱ्याच दिवशी साेमवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापून केरळच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंतचा टप्पा पुर्ण केला. दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव - कोमोरीन परिसर, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, पूर्वमध्य, अग्नेय भागामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. 
अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस चाल मिळाली आहे.

अरबी समुद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर रविवारी निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी ठळक झाले होते. यातील कर्नाटकच्या किनारपट्टीवरील कमी दाब  तर बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमध्य भागामध्ये सोमवारी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...