agriculture news in marathi, monsoon progress after two weeks, Maharashtra | Agrowon

दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची प्रगती..
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह देशातील आणखी काही भागात मॉन्सूनची वाटचाल शक्य असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह देशातील आणखी काही भागात मॉन्सूनची वाटचाल शक्य असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होणे, माॅन्सूनच्या वाटचालीसाठी आवश्‍यक ‘मेडिअन जुलिअन ऑस्सिलेशन’ची (एमजेओ) प्रतिकूल स्थिती, मध्य आणि पूर्व प्रशांत महासागर, पश्‍चिम गोलार्ध, आफ्रिकेलगत पूर्वेकडे जाणारे प्रवाह, वायव्य प्रशांत महासागरात हवेचे कमी झालेले दाब यामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला. वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्याने मॉन्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल ११ जूनपासून झाली नव्हती. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जूनपासून मॉन्सूनची स्थिती जैसे थे होती. मात्र ‘एमजेओची’ स्थिती पोषक झाल्यानंतर शनिवारी तब्बल १४ दिवसांनंतर या भागात मॉन्सूनेने दक्षिण गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, विदर्भातील अमरावतीपर्यंत वाटचाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
 
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण होत असून, मंगळवारपर्यंत (ता. २६) उत्तर अरबी समुद्र, उर्वरित महाराष्ट्र, आसाम, तसेच गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात माॅन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. तर वायव्य भारतातील राज्यांमध्ये बुधवारपासून विजांसह पूर्वमोसमी पावसाला सुरवात होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...