मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत मजल
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत मजल

मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत मजल

पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. अद्यापाही वादळाचे अस्तित्व असल्याने अरबी समुद्रातून मॉन्सूनने अपेक्षित चाल केलेली नाही. तर बंगालच्या उपसागरावरील शाखेने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे. रविवारी (ता. १६) मॉन्सूनने संपूर्ण ईशान्य भारत व्यापून पूर्व भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागापर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.  ‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला उत्तरेकडील प्रवास सुरू करत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १४) दक्षिण कर्नाटकच्या मंगळूर, मैसूर, तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत मजल मारली. ईशान्य भारतातील त्रिपुरा, असाम आणि अरुणाचल प्रदेश राज्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल झालेली नाही. मात्र रविवारी बंगालच्या उपसागरावरील शाखेने सिक्कीमची राजधानी गंगटोक आणि पश्चिम बंगालमधील अलीपूरदूअरपर्यंतच्या भागापर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे.  केरळमध्ये यंदा आठवडाभर उशिराने येणाऱ्या मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही खूपच लांबले आहे. सर्वसाधारण वेळेनुसार साधारणत: ७ जूनपर्यंत तळकोकणात मॉन्सूनचे आगमन होते. तर १० जूनपर्यंत मॉन्सून पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापतो. तर १५ जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करत, पूर्व भारतातील सर्व राज्य, गुजरात आणि मध्य प्रदेशाचा बहुतांशी भाग व्यापतो. यावर्षी सुरवातीपासून अडखळणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल खूपच धीम्या गतीने सुरू आहे. १६ जून उलटूनही मॉन्सूनने दक्षिण कर्नाटकपर्यंतच मजल मारली आहे. ‘वायू’ चक्रीवादळ ओसरतेय अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत घोंघावत असलेले अतितीव्र वायू चक्रीवादळ आसेरत आहे. गुजरातच्या किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ पुन्हा गुजरातच्या किनाऱ्याकडे माघारी फिरणार आहे. रविवारी (ता. १६) सकाळी अकरा वाजता हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावरील पोरबंदरपासून पश्चिमेकडे ७४० किलोमीटर, द्वारकापासून ४४० किलोमीटर आणि भूजपासून ५४५ किलोमीटर पश्चिमेकडे समुद्रात होते. हे वादळ सोमवारी मध्य रात्रीपर्यंत वादळ तीव्र कमी दाब क्षेत्राच्या स्वरूपात उत्तर गुजरातला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत (ता. १८) गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com