मॉन्सूनची विदर्भात बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत प्रगती

मॉन्सूनची विदर्भात बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत प्रगती
मॉन्सूनची विदर्भात बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत प्रगती

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मजल-दरमजल करीत आज विदर्भात प्रगती केली. मॉन्सूनने बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंतचा भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले अाहे. आसाम, मेघालयासह, छत्तीसगड व पश्‍चिम बंगालच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टीवर तो सक्रीय अाहे. विदर्भातही जोरदार पाऊस पडला अाहे. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

माॅन्सूनने शनिवारी (ता. ९) निम्मा महाराष्ट्र व्यापल्यानंतर रविवारी (ता.११) कोणतीही प्रगती केली नव्हती. त्यानंतर आज सोमवारी मॉन्सूनने विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील माॅन्सूनची सीमा मात्र कायम आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनने ईशान्य आणि पुर्व भारतातील राज्यांमध्ये हजेरी लावली आहे. मात्र हे कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) पुर्व भारतातील आणखी काही राज्यांमध्ये माॅन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com