देशात सरासरी सहा टक्के कमी पाऊस

देशात सरासरी  सहा टक्के कमी पाऊस
देशात सरासरी सहा टक्के कमी पाऊस

पुणे : गेल्या पावणेतीन महिन्यांत देशातील अनेक भागांत कमी-अधिक पाऊस झाला आहे. अजूनही काही भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. देशात एक जून ते २३ आॅगस्ट या कालावधीत सरासरी ६५५.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो; परंतु चालू वर्षी याच कालावधीत ६१९.३ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस सहा टक्क्यांनी कमी अाहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.एक जून ते २३ आॅगस्ट या कालावधीत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरी १०५५.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात ईशान्य भारतात १०६९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत अवघा एक टक्का अधिक पाऊस पडला आहे.

वायव्य भारतात सरासरी ४५७.८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ४४३.१ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत तीन टक्के कमी पाऊस पडला. मध्य भारतात ७२६.४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा २३ आॅगस्टपर्यंत ६६३.६ मिलिमीटर म्हणजेच ९ टक्के कमी पाऊस पडला. दक्षिण द्वीपकल्प भागात ४५३. ८ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १३ टक्के कमी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तरी अजूनही देशातील अनेक भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com