Agriculture news in Marathi, Monsoon, rain | Agrowon

पावसाचा जोर ओसरला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पुणे : सौराष्ट्र व लगतच्या गुजरातच्या उत्तरेकडील भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कच्छ व लगतच्या पाकिस्तानच्या दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या ईशान्य भागाकडे सरकले आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागात पावसाने उघडीप दिली.  

पुणे : सौराष्ट्र व लगतच्या गुजरातच्या उत्तरेकडील भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कच्छ व लगतच्या पाकिस्तानच्या दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या ईशान्य भागाकडे सरकले आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागात पावसाने उघडीप दिली.  

कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी येत्या सोमवार (ता. ४) पर्यंत हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. आज कोकणातील बहुतांशी ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

कोकणातील काही ठिकाणी बुधवारी जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी हलक्या पावसाची रिमझिम सुरू होती. चिपळूणमध्ये सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडला. गुरुवारी (ता.३१) कोकणात अधूनमधून सरी बरसत होत्या. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, लोणावळा, राधानगरी, मावळ, वेल्हा, भोर, मुळशी व महाबळेश्वर परिसरात हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. तर काही ठिकाणी सकाळपासून उन पडत होते.

इतर अॅग्रो विशेष
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...
दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी...देशात दुधाचा ओघ वाढ आहे. इतरवेळी जेवढी मागणी...
दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर...पुणे ः महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध...
दूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफीलपुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे...
राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्तमंचर, जि. पुणे : राज्यात दररोज दोन कोटी वीस लाख...
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामानपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य...
शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमाताचा...
दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा...वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा...
दूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुललाखगंगा, जि. औरंगाबाद : फुकट दूधवाटप केल्यानंतर...
येडियुरप्पांची आज अग्निपरिक्षानवी दिल्ली  : कर्नाटकात सत्ता स्थापन...
पिकांच्या अवशेषांपासूनही बनणार इथेनॉलनवी दिल्ली ः देशात मोठ्या प्रमाणात होणारी...
निवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील...वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील...
मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरणपुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या...