कोकण, मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज

पुणे : राज्याच्या काही भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरात, कच्छच्या दिशेने सरकले. यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात येत्या बुधवार (ता.५) पर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  कच्छ व पाकिस्तानच्या दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या ईशान्य भागात असलेले ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाला आहे. सध्या हे क्षेत्र पाकिस्तानच्या दक्षिण भाग व परिसरात आहे. त्यामुळे राज्यातील हवेचे दाब वाढत असून पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. आज (शनिवार) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मधूनमधून पावसाच्या सरी बरसतील. पुणे परिसरातही येत्या शुक्रवार (ता.७) पर्यंत काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.  शुक्रवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. कोकणातील सांगे येथे  ५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com