Agriculture news in Marathi, Monsoon, rain, Imd | Agrowon

हलक्या सरींची शक्यता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबईसह सध्या राज्यभरात पावसाचा जोर ओसरला आहे. ३ सप्टेंबरपर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. बुधवारी (ता.३०) कोकणात काही ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी ढगाळ, तर अनेक ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते.

गेले चार ते पाच दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी, कोकणातील भात या पिकांना दिलासा मिळाला असून पिकेही वाढीच्या अवस्थेत आहे. मुंबईसह सध्या राज्यभरात पावसाचा जोर ओसरला आहे. येत्या ३ सप्टेंबरपर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

सध्या गुजराच्या मध्य भाग व लगतच्या काही भागांवर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्र व लगतच्या गुजरात प्रदेशाच्या उत्तरेकडील भागात आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर द्रोणीय क्षेत्र आहे. त्यामुळे या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र मंगळवारी (ता.२९) कोकणातील अनेक ठिकाणी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मुंबईत (सांताक्रूझ) सर्वाधिक ३३० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद बुधवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत झाली.

कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडला. मुंबई, पालघर, ठाणे, पेण, माथेरान, भिरा, वसई, सुधागडपाली, उल्हासनगर येथे मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील चौल, रामराज, पोयान्जे, कर्नाळा, खडव, कशाळे मंडळातही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील कळकावने, शिरगाव, जैतापूर, नाते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटगाव, बापर्डे, सांगवे, येडगाव, निर्मळ, मनोर, अंगरवाडी, खोडला मंडळांतही जोरदार पाऊस पडला. उर्वरित ठिकाणीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.  जोरदार पावसाचा फायदा भात पिकांना झाला असून, भात पिके वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या तर काही ठिकाणी लवकर लागवड झालेल्या भात पिके पोटरीच्या अवस्थेत असून, पुनर्लागवड झालेल्या भात पिकांची वाढ जोमदार आहे.

हलक्‍या सरींचा अंदाज 
राज्यातील काही भागांत हवेचे दाब वाढत असल्याने पावसाचा जोर कमी होत आहे. येत्या रविवार (ता. ३) पर्यंत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्‍या सरी बरसण्याचा अंदाज आहे. आज (गुरुवारी) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

बुधवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये ः कोकण ः मुंबई ३३०, पालघर २८०, ठाणे, २५०, पेण २००, माथेरान १९०, भिरा, वसई १४०, सुधागडपाली, उल्हासनगर १३०, बेलापूर १२०, अंबरनाथ, कर्जत, खालापूर, म्हसळा, वाडा ६०, कणकवली, मुरबाड, सावंतवाडी, वेभववाडी ५०.
मध्य महाराष्ट्र ः लोणावळा २१०, महाबळेश्वर ११०, राधानगरी ९०, धाडगाव ८०, हरसूल, इगतपुरी, नंदुरबार, पेठ ७०, पन्हाळा ६०
मराठवाडा ः देवणी ५०, उस्मानाबाद ३०, औसा, लातूर, रेणापूर, उमरगा २०, अहमदपूर, आष्टी, भूम, बिल्लोली, चाकूर, देगलूर, धर्माबाद, जळकोट, किनवट, लोहार, मुखेड, नायगाव, खैरगाव, निलंगा, परभणी, शिरूर अनंतपाल, सोयेगाव, उदगीर १०, 
विदर्भ ः रामटेक ८०, चिमूर, खामगाव, कुही, ६०, चंद्रपूर, चिखलदरा, कामठी, मालेगाव, मलकापूर, मोरसी ५०, वरूड ४०. 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत...अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा...
भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि...
नोकरीसाठीच नव्हे, तर शेतीसाठी कृषी...बुलडाणा : सध्या प्रत्येकाला नोकरी हवी आहे....
कपाशीचे पीक बोंडअळीच्या घशातकिनगाव ः कापूस राज्यातील दुसरे महत्त्वाचे...
डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष... राहुरी, जि. नगर : डॉ. तनपुरे सहकारी साखर...
शरद पवारांकडून ३२ वर्षांनंतर मोर्चाचे...नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज...
विधान भवनावर विरोधकांचा आज हल्लाबोल...नागपूर : शेतकरी कर्जमाफी, बोंड अळीमुळे कपाशीचे...
पुणे जिल्ह्यातील धरणांत १४३ टीएमसी...पुणे : यंदा पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात...
हरभरा क्षेत्रात ९७ हजार हेक्टरने वाढ परभणी : खरिपातील सोयाबीन, कापूस या प्रमुख नगदी...
शेतकरी आत्महत्येला जबाबदार मंत्र्यांवर...मानोरा, जि. वाशीम ः सोयजना येथील शेतकरी...
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम...नाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील...
नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपयेनागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
कोल्हापुरात गवार, मटार तेजीतकोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड...धुळे ः गुलाबी बोंडअळीचा उद्रेक, सिंचनासाठी...
अमरावतीत बोंडअळीमुळे कपाशीत ५१...अमरावती ः या वर्षीच्या हंगामात जिल्ह्यात एक लाख ३...
खासदार सुप्रिया सुळे यांना नागपुरात अटक...नागपूर : राज्यातील झोपी गेलेल्या सरकारला जागे...
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...