पावसासाठी तयार होतेय पोषक स्थिती

पावसासाठी तयार होतेय पोषक स्थिती

पुणे : सध्या राज्यातील काही ठिकाणी हवेचा दाब कमी होत आहे. यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून, शनिवार (ता. २६) पासून पुन्हा राज्यातील बहुतांशी भागांत जोरदार पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बुधवारी (ता. २३) कोकणातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला, तर राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. येत्या शनिवारपर्यंत पोषक हवामान होऊन जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज (गुरुवारी) कोकणातील बहुतांशी ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही ढगाळ हवामान होते. मंगळवारी (ता. २२) रात्री कोकणातील दोडामार्ग, मापूसा, दाभोलीम, हर्णे येथे हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील राधानगरी, शिरपूर येथेही पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मराठवाड्यातील धारूर, केज, अंबेजोगाई येथेही हलक्‍या सरी कोसळल्या. विदर्भातील अकोट, चिखलदरा, दिनापूर, मेहकर, परतवाडा, वाशीम येथेही पाऊस पडला.  बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये कोकण ः दोडामार्ग, मापूसा ३०, दाभोलीम, हर्णे, मार्मगोवा, पेडणे, पेरनेम, फोंडा, राजापूर, उरण २०, खालापूर, मडगाव, माथेरान, म्हसाळा, मुलदे, श्रीवर्धन, वैभववाडी, वाल्पोई, वेगुर्ला १०,  मध्य महाराष्ट्र ः राधानगरी, शिरपूर २०, चोपडा, धरनेगाव, गगनबावडा, इगतपुरी, जामखेड, शेवगाव १०,  मराठवाडा ः धारूर, केज २०, अंबेजोगाई, बिल्लोली, चाकूर, गंगापूर, कळंब, परळीवैजनाथ, पाटोदा १०,  विदर्भ ः अकोट ४०, चिखलदरा ३०, दिनापूर, मालेगाव, मेहकर, परतवाडा, तेल्हारा, वाशीम २०, अंजनगाव,  राजूरा १०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com