कोकण, मध्य महाराष्ट्रात ४२ मंडळांत अतिवृष्टी 

मावळ तालुक्‍यातील (जि. पुणे) काले मंडळात सर्वाधिक 184 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर लोणावळा मंडळात 142, शिवने 127, कार्ला मंडळात 104, खडकाळा मंडळात 74 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात ४२ मंडळांत अतिवृष्टी
कोकण, मध्य महाराष्ट्रात ४२ मंडळांत अतिवृष्टी

पुणे : गणरायाचे आगमन झाल्यानंतर वरुणराजाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जवळपास 42 मंडळांत अतिवृष्टी झाली असून, मध्य महाराष्ट्रात असलेल्या मावळ तालुक्‍यातील काले मंडळात रविवारी (ता. 27) सर्वाधिक 184 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. कोकणातील अनेक भागांत रविवारी हलक्‍या सरी बरसत होत्या. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ हवामान होते. 

कोकणात मुसळधार  सध्या कोकणातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाले आहे. त्यामुळे कोकणातील ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मंडळात येथे सर्वाधिक 142 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद रविवारी झाली. तर बदलापूर मंडळात 135, अंबरनाथ 119, कुंभारी 120, कल्याण 87, उप्पेर 87, भिवंडी 92, अनगाव 80, दिघाशी 80, पाडघा 86, खर्बव मंडळात 90 मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटगाव मंडळात 84 मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित काही ठिकाणी हलका पाऊस पडला. पालघर, मुंबईतील उपनगरांतही पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. रायगड जिल्ह्यातील निझामपूर मंडळात सर्वाधिक 126 मिलिमीटर पाऊस पडला. तर चौक मंडळात 122, खोपोली 115, वावोशी 103, पोयनाड 69, चारी 73 कर्जत 83.6, नेरळ 89, आटोने 74, जाबुळपाडा 78, पेण 80, कामर्ली 78, कोळद मंडळात 70 मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर मंडळात सर्वाधिक 127 मिलिमीटर पाऊस झाला. नाते मंडळात 125, रत्नागिरी 95, खेडशी 87, पावस 110, फानसोप 75, मालगुड 75, तरवाल 81, पाली 78, सातवली 85 मिलिमीटर पाऊस झाला. 

काले मंडळात सर्वाधिक पाऊस ः   मध्य महाराष्ट्रातील सहा मंडळांत अतिवृष्टी झाली असून, मावळ तालुक्‍यातील (जि. पुणे) काले मंडळात सर्वाधिक 184 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर लोणावळा मंडळात 142, शिवने 127, कार्ला मंडळात 104, खडकाळा मंडळात 74 मिलिमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित मुळशी, भोर, वेल्हा, खेड, हवेली, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतही पावसाच्या हलक्‍या बरसल्या. साताऱ्यातील महाबळेश्वर मंडळात 83 मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागांत हलक्‍या सरी कोसळल्या असून, काही तालुक्‍यांत ढगाळ हवामान होते. कोल्हापुरातही काही ठिकाणी हलका पाऊस पडला. तर सोलापूर, सांगली, नगर, खानदेशातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत ढगाळ हवामान होते. 

मराठवाड्यात ढगाळ हवामान ः  मराठावाड्यातील बीड, नांदेड, औंरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले असून, धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला.  तर लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांत ढगाळ हवामान होते. या जिल्ह्यातील एखाद्या दोन ठिकाणी हलका पाऊस पडल्याचे चित्र होते. रविवारी (ता. 27) मराठवाड्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे हवामानात दमटपणा वाढला होता. 

विदर्भात हलका पाऊस ः  विदर्भातील बुलडाणा, अकोला, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा जिल्ह्यांतील अनेक मंडळांत पावसाने हजेरी लावली असून, काही मंडळांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक भागांत ढगाळ हवामान असून, पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र शनिवारी होते. विदर्भात झालेल्या पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन या पिकांना दिलासा मिळाला आहे. रविवारीही विदर्भातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते. तर नागपूर शहरात जोरदार सरी बरसल्या आहेत.  कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस ः  येत्या गुरुवार (ता. 31)पर्यंत कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज (सोमवारी) राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार, उद्या (मंगळवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला असून, कोकणातील बहुतांशी ठिकाणी हलक्‍या सरी बरसतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.  रविवारी (ता. 27) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये ः  कोकण ः उल्हासनगर 140, खालापूर 110, भिवंडी, माथेरान 90, कर्जत, पनवेल, पेण, रत्नागिरी 80, कानकोन, दाभोलीम, म्हसाळा, सुधागडपाली, वेंगुर्ला 70,  बेलापूर, मार्मगोवा 60, गुहागर, खेड, लांजा, संगमेश्वरदेवरूख, सावंतवाडी 50, देगवड, हर्णे, कुडाळ, मालवण, मंडणगड, माणगाव, मुंबई, पेडणे, राजापूर, रोहा,  सांगे 40, अलिबाग, चिपळून, कणकवली, महाड, म्हापसा, पोलादपूर, फोंडा, श्रीवर्धन, उरण, विक्रमगड 30, दापोली, दोडामार्ग, ईला, मुरूड, केपे, सांगेलीम,  शहापूर, तलासरी वैभववाडी, वसई, वाडा 20, मोखाडा 10  मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्वर 80, अक्कलकोट, सुरगाणा, यावल 50, गगनबावडा 40, इगतपुरी, साक्री, पौंड, मुळशी, राधानगरी, वडगावमावळ 30, भुसावळ,  चोपडा, हरसूल, जामखेड, शाहूवाडी, वेल्हे 20, आंबेगाव, घोडेगाव, बारामती, भडगाव, चाळीसगाव, चंदगड, दिंडोरी, ओझरखेडा, पाचोरा, पाथर्डी, पेठ, पुणे,  सांगोला 10,  मराठवाडा ः रेणापूर 150, अर्धापूर, पालम 60, चाकूर 50, मानवत, मुदखेड, परंडा, शिरूर, अनंतपाळ 40, अंबेजोगाई, मोमिनाबाद, हदगाव, सोनपेठ, माजलगाव, वसमत 30, आष्टी, बिल्लोली, घनसांगवी, लातूर, मुखेड, नायगाव, सोयेगाव, उमरी, वडवणी 20, अहमदपूर, औंढानागनाथ, औसा, गेवराई, कळंब, कंधार, कन्नड, निलंगा, पूर्णा 10,  विदर्भ ः वणी 60, कुही 40, काटोल, मारेगाव, रिसोड, सावनेर, यवतमाळ 30, जोईती, कळमेश्वर, पौनी 20, आमगाव, आरनी, बाळापूर, बटकुली, भामरागड, भंडारा, भिवापूर, बुलडाणा, चार्मोर्शी, धानोरा, मूर्तिजापूर, नरखेडा, पांढरकवडा, समुद्रपूर, शेगाव, उमेरखेड 10,  घाटमाथा ः खोपोली 160, लोणावळा (टाटा), लोणावळा (ऑफिस), वळवण 140, अंबोणे, दावडी, ताम्हिणी 90, डुंगरवाडी, कोयना (नवजा) 80, शिरगाव 70, भिरा, शिरोटा, भिवपुरी, धारावी 60, कोयना (पोफळी), खंद 40, वाणगाव, ठाकूरवाडी 20

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com