Agriculture news in Marathi, Monsoon, rain, Maharashtra | Agrowon

राज्यातील ६४ मंडळांत अतिवृष्टी
संदीप नवले
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे : कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यातील अनेक भागांत रविवारी (ता.२७) सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यातील जवळपास ६४ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

पुणे : कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यातील अनेक भागांत रविवारी (ता.२७) सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यातील जवळपास ६४ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.

सोमवारी (ता. २८) कोकणातील बहुतांशी ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, इगतपुरी, अकोले, महाबळेश्वर या तालुक्‍यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. मराठवाडा व विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. 

कोकणात मुसळधार ः 
कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला, तर काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण मंडळात १०८, उप्पेर १०८, उप्पेर ८८, डोलखांब ८०.३, अंबरनाथ ११५, कुंबार्ली ८०, बदलापूर १४६ मिलिमीटर पाऊस पडला.  रायगड जिल्ह्यातील चौल मंडळात ७२, रामराज ७०, पोयान्जे ११३.२, कर्नाळा ११८, खडव ७०, कशाळे ७०, वावोशी ८३, खोपोली ८०, उरण ९६, कोपरोली १०५, पेण १०० हमरापूर १३५, वाशी ११४,  कासू ११७, कामर्ली १०५, मानगाव ७५, इंदापूर ७५, लोनारे ७१, रोहा ८८, पोलादपूर ८२, कोळद ८६, खामगाव ७८.६ मिलिमीटर पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील  कळकावने मंडळात ८०, शिरगाव ८४, जैतापूर १०७, नाते १०२, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटगाव मंडळात ११२, बापर्डे ७१, सांगवे ७०, नांदगाव १००, येडगाव ८५, निर्मळ ७६, कांचद ७२, मनोर ७२, अंगरवाडी ७५, खोडला ७१ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित ठिकाणीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सोमवारी (ता. २८) कोकणातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. धारावी, अंबोणे, ताम्हिणी, डुंगरवाडी, खोपोली या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रात जोरदार ः 
मध्य महाराष्ट्रात रविवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. दुपारनंतर पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील पाळंदी मंडळात सर्वाधिक ७४ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील काले मंडळात सर्वाधिक ११३ मिलिमीटर पाऊस पडला. तर शिवने मंडळात ९०, राजूर ७४, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मंडळात ७० मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागातही हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून ओढे, नाले भरून वाहत आहे. सोमवारी (ता. २८) मध्य  महाराष्ट्रातील अनेक भागांत हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून गंगापूर, दारणा, खडकवासला, भंडारदरा, चासकमान, कळमोडी ही धरणे भरली असून, पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.   

मराठवाड्यातही दमदार हजेरी ः 
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या मराठवाड्यातही रविवारी सायंकाळी दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील  चिखलठाणा मंडळात ७६ तर  वरुडकाझी मंडळात ९४ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागांतही हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून, पिकांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील  मांजरसुंबा मंडळात ७८, नेकूनर ७२, तेरला ८५, अंमळनेर ७६, धामणगाव ७६ मिलिमीटर पाऊस बरसला. लातूर जिल्ह्यातील शी मंडळात ९० मिलिमीटर पाऊस पडला असून जालना, उस्मानाबाद,  परभणी, नांदेड जिल्हयातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. हिंगोली जिल्ह्यातील औढा मंडळात ८५, येहलेगाव ७०, साक्रा ९४, हट्ट ९८ मिलिमीटर पाऊस पडला. सोमवारीही मराठावाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम 
स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. 

विदर्भातही सर्वदूर पाऊस ः  
विदर्भातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाल्यामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील भातकुली मंडळात ८६.४, निंबा ८८.८ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागातही हलका पाऊस पडला, तर नागपूर जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली असून, येथे वरोडा मंडळात ७१.६, मौझा ९३.२ मिलिमीटर पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. तर वाशिम, बुलडाणा, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील 
अनेक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या. सोमवारीही विदर्भातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. 

सोमवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये 
कोकण ः अंबरनाथ, कल्याण ११०, पेण, उरण १००, रोहा ९०, खालापूर, पोलादपूर, वसई ८०, मानगाव, पनवेल, रामेश्वरवाडी, संगमेश्वर देवरूख, उल्हासनगर ७०, 
देवगड, खेड, म्हसाळा, मुंबई, ६०, बेलापूर, भिवंडी, काणकोण, चिपळून, हर्णे, कणकवली, कर्जत, महाड, मडगाव, माथेरान, पालघर, फोंडा, सुधागडपाली, 
तलासरी वैभववाडी, वाडा ५०, अलिबाग, मंडणगड, मुरूड, राजापूर, रत्नागिरी, शहापूर, ठाणे, वेंगुर्ला, वाकवली ४०, दापोली, दोडामार्ग, गुहागर, कुडाळ, लांजा, 
मालवण, मोखडे, मुरबाड, पणजी, पेडणे, सावंतवाडी, श्रीवर्धन, वाल्पोई, विक्रमगड ३०, केपे २०, दाभोलीम, डहाणू, जव्हार, म्हापसा, मार्मगोवा १०, 

मध्य महाराष्ट्र ः लोणावळा (कृषी) ८०, जामखेड, महाबळेश्वर ७०, बार्शी ६०, दहिगाव, इगतपुरी ५०, नगर, गगनबावडा, मुल्हेर, साक्री, राधानगरी, सुरगाणा ४०, 
अक्कलकोट, चाळीसगाव, चंदगड, धडगाव, हरसूल, मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर, वडगाव मावळ ३०, आंबेगाव, घरदेव, चोपडा, एरंडोल, गारगोटी, 
जळगाव, माढा, मोहोळ, ओझर, पौंड, मुळशी, पेठ, पुणे, सटाणा, बागलाण, शिरूर २०, अक्कलकुवा, बारामती, धरणगाव, दिंडोरी, कळवण, कर्जत, खेड, राजगुरुनगर, 
नंदुरबार, नेवासा, पाचोरा, पन्हाळा, पारनेर, पाटण, पुरंदर, रावेर, शहादा, शाहूवाडी, शेवगाव, श्रीगोंदा, त्र्यंबकेश्वर, वेल्हे, येवला १०

मराठवाडा ः औढा नागनाथ ९०, औरंगाबाद ७०, कळंब ५०, अहमदपूर, भूम, हिंगोली, सेनगाव ४०, गंगाखेड, जळकोट, जालना, कन्नड, उस्मानाबाद, फुलंब्री, वैजापूर, वसमत ३०, अंबेजोगाई, आष्टी, चाकूर, धारूर, हदगाव, हिमायतनगर, केज, कळमनुरी, लोहारा, मंठा, नांदेड, पाटोदा, पूर्णा, तुळजापूर, वाशीम २०, अंबड, अर्धापूर, बिल्लोली, गंगापूर, गेवराई, घनसांगवी, जितूर, खुलताबाद, मानवत, परंडा, परभणी, परतूर, रेणापूर, शिरूर कासार, सोयगाव, उमरगा, वडावणी १०, 

विदर्भ ः मौदा  ९०, मूलचेरा ५०, बटकोली, वणी ४०, आमगाव, हिंगणा, काटोल, सालेकसा, तेल्हारा, तिरोरा ३०, अमरावती, अर्जुनी मोरगाव, अरनी, चार्मोशी, देवरी, धारणी, कळमेश्वर, लाखंदूर, रामटेक, उमेरखेड झारीझामनी २०, अकोट, अंजनगाव, बाळापूर, कुही, कुरखेडा, लाखानी, मारेगाव, मोरसी, मूर्तिजापूर, नागपूर, परतवाडा, सडकअर्जुनी, साकोली, सेलू, सिंरोचा, तिवसा १०, 

घाटमाथा ः धारावी ११०, लोणावळा (टाटा), लोणावळा (आँफीस), अंबोणे, ताम्हिणी ९०, डुंगरवाडी ८०, खोपोली ७०, भिरा, शिरगाव, वळवण, भिवपुरी, दावडी ६०, 
कोयना (नवजा), कोयना (पोफळी) ५०, शिरोटा, खंद ४०, वाणगाव, ठाकूरवाडी २०  

कोकणात अतिवृष्टीचा इशारा  
कोकणाच्या उत्तर भागात काही ठिकाणी जोरदार व तुरळक ठिकाणी आज (मंगळवारी) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या शुक्रवारपर्यत (ता. १) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत हवामान विभागाच्या सूत्रांनी दिले. 
 

 

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...