तीन महिन्यांत ८० टक्के पाऊस
संदीप नवले
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पुणे : राज्यात एक जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत सरासरी ९२९.२ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा मात्र ७४३.२ मिलिमीटर (८०.० टक्के) पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास आत्तापर्यंत वीस टक्के कमी पाऊस पडला आहे. एकंदरीत जून महिना आणि जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास जूनमध्ये अधिक पाऊस पडल्याचे दिसून येते. 

पुणे : राज्यात एक जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत सरासरी ९२९.२ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा मात्र ७४३.२ मिलिमीटर (८०.० टक्के) पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास आत्तापर्यंत वीस टक्के कमी पाऊस पडला आहे. एकंदरीत जून महिना आणि जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास जूनमध्ये अधिक पाऊस पडल्याचे दिसून येते. 

यंदा वेळेवर मॉन्सून दाखल झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत अनेक ठिकाणी कमी- अधिक पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला असला तरी, मराठवाडा आणि विदर्भात दडी मारल्याचे चित्र अनुभवास मिळाले. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडिद पिकांचे नुकसान झाले. परंतु, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. राज्यातील वीस जिल्ह्यांत ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चौदा जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्‍क्‍याच्या दरम्यान पाऊस झाला आहे. परिणामी तूर, बाजरी, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, भात पिकांना दिलासा मिळाला असून आगामी काळात पाणीटंचाई कमी होईल अशी अपेक्षा आहे.

कोकणात सर्वाधिक पाऊस ः 
पावसाचे आगमन झाल्यानंतर कोकणातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गेल्या तीन महिन्यांत कोकणात दोन हजार ५८२ मिलिमीटर पैकी दोन हजार ६५४ मिलिमीटर म्हणजेच सरासरी १०२ टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात कोकणात सर्वाधिक म्हणजे ११९.४ टक्के पाऊस झाला. जुलैमध्ये ९४.१ टक्के पाऊस झाला. ऑगस्टमध्ये १०१.७ टक्के पाऊस झाला. एकंदरीत तीन महिन्यांत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक म्हणजेच प्रत्येकी ९४.२ आणि ७९.४ टक्के पाऊस पडला आहे.  

मध्य महाराष्ट्रातही जोरदार हजेरी ः 
गेल्या तीन महिन्यांत मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर आणि नाशिकच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, सोलापूर, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दडी मारल्याचेच चित्र होते. ऑगस्टमध्ये झालेल्या सर्वदूर पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. या कालावधीत नाशिक विभागात सरासरी ५५२.२ मिलिमीटरपैकी ५२१.८ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ९४.५ टक्के पाऊस पडला. पुणे विभागात ७१३.३ मिलिमीटरपैकी ५७१.३ मिलिमीटर म्हणजेच ८०.१ टक्के पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नगर आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात ७५ 
टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गंगापूर, दारणा, कोयना, राधानगरी, खडकवासला, भंडारदरा, उजनी, भाटघर अशी अनेक धरणे भरून वाहू लागली. त्यामुळे भात पिकांना चांगला दिलासा मिळाल्याचे दिसून येते.     

मराठवाड्याला दिलासा ः 
सर्वाधिक पाणीटंचाई भासत असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाचे अडीच महिने उलटले तरी पुरेसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मराठवाडा धरणांनी अक्षरश तळ गाठला होता; परंतु गेल्या आठवड्यापासून कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा अनेक भागात जोरदार ते मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कापूस, तूर या पिकांना दिलासा मिळाला. गेल्या तीन महिन्यांत सरासरी ५४४.३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ४५७.३ मिलिमीटर म्हणजेच ८४.० टक्के पाऊस पडला. जूनमध्ये मराठवाड्यात सरासरी १४५ मिलिमीटरपैकी १७१.५ मिलिमीटर म्हणजेच ११७.६ टक्के पाऊस पडला. तर जुलैमध्ये २०१.२ मिलिमीटरपैकी अवघा  ७३.८ मिलिमीटर म्हणजेच ३६.७ टक्के पाऊस पडला. ऑगस्टमध्ये १९७.३ मिलिमीटरपैकी २१२ मिलिमीटर म्हणजेच १०७.५ टक्के पाऊस पडला. गेल्या तीन महिन्यांत बीड, लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला. तर नांदेड हिंगोली व परभणीमध्ये ५० टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला.  

विदर्भात पावसाची हुलकावणीच ः 
विदर्भात उशिरा दाखल झालेल्या पावसाने अनेक भागात हुलकावणी दिल्याचे चित्र आहे. जुलैमध्ये विदर्भात दडी मारल्याने शेतकऱ्यांना अक्षरश पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली होती. विदर्भातील नागपूर बुलडाणा जिल्ह्यात शंभर टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये ७५ टक्केपेक्षा कमीपाऊस झाल्यांची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. एक जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अमरावती विभागात सरासरी ६२५.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ४०९.७ मिलिमीटर म्हणजेच ६५.५ टक्के पाऊस पडला आहे. नागपूर विभागात ९५२.२ मिलिमीटर पाऊस पडतो. चालू वर्षी ६२०.१ मिलिमीटर म्हणजेच ६५.१ टक्के पाऊस पडला आहे. जूनमध्ये विदर्भात सर्वाधिक पाऊस पडल्याचे दिसून येते. जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने अत्यंत कमी पाऊस पडला आहे. १९ ऑगस्टनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अमरावती विभागात ५९.३ टक्के, तर 
नागपूर विभागात ६४.५ टक्के पाऊस पडल्याचे दिसून येते.  

जिल्हानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
+ ७५ टक्केपेक्षा कमी पावसाचे जिल्हे ः जळगाव, कोल्हापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली 

+ १०० टक्केपेक्षा कमी पावसाचे जिल्हे ः रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा, नागपूर

+ १०० टक्केपेक्षा अधिक पावसाचे जिल्हे ः ठाणे, रायगड, पालघर, नगर, पुणे, बीड, लातूर, 

+ मोठ्या खंडाने आणले जेरीस 
राज्यात १३ जूनला मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर हळूहळू वाटचाल करत त्याने संपूर्ण राज्य व्यापले. या कालावधीत अनेक वेळा पावसाचा खंडदेखील पडल्याचे दिसून येते. गेल्या तीन महिन्यांतील पावसाचा विचार केल्यास जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी  मारली. तेरा जुलैपासून मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला. वीस जुलैनंतर पुन्हा पाऊस गायब झाला. त्यानंतर १९ ऑगस्टपासून मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला.

महिनानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
विभाग ---  जून ---       जुलै ---    ऑगस्ट -- एकूण 
कोकण ---  788.4 --- 1096.1 --- 770.7 ---2654.5 
नाशिक ---  138.4 --- 219.6 ---  163.8 --- 521.8 
पुणे ---       167.9 ----266.7 ---  136.7 --- 571.3 
औंरंगाबाद -171.5 --- 73.8 ---     212.5 ---457.3 
अमरावती - 138.1 --- 147.1 ---  124.5 --- 409.7 
नागपूर ---- 118.5 --- 274.4 ---   227.2 --- 620.1 
एकूण ----- 219.2 --- 289.0 ---   235.2 --- 743.2 
 

इतर अॅग्रो विशेष
बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा :...जळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे...
सहकार विकास महामंडळ विसर्जित करण्याची...पुणे ः सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करून...
कांदा दर अजून सव्वा महिना टिकून राहतील...नाशिक : लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता.25)...
मत्स्य़पालन ठरले फायदेशीर आसेगाव (जि. वाशिम) येथील खानझोडे बंधू यांनी...
कर्जमाफी अर्जांची साठ टक्के छाननी झाली...मुंबई ः शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन...
फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ...एकीकडे शेतीत यांत्रिकीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे...
सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान हवामान :  तीनही हंगामात लागवड शक्‍य...
बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी...मुंबई ः सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार...
नाशिक जिल्ह्यातील १६ धरणे तुडुंब नाशिक  : जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह,...
मूग, उडीद पीककापणीची माहिती २८ पर्यंत...मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मूग आणि...
गरज पडल्यास अाणखी साखर अायात : केंद्रीय...नवी दिल्ली: देशात जर साखरेची गरज पडल्यास अाणखी...
जळगाव जिल्ह्यात ‘कृषी’ संबंधित ३९९ पदे...जळगाव ः जिल्ह्यात राज्य शासनांतर्गत असलेल्या...
भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी...कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असला...
पूर्व विदर्भात धानावर गादमाशी,...नागपूर ः पूर्व विदर्भात यंदा पावसाअभावी ८० टक्‍के...
भेंडी पिकात कमीत कमी निविष्ठा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
मॉन्सून २८ पासून परतीच्या मार्गावरपुणे : सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारेरब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व...
ऊस उत्पादकांच्या खिशाला ३६१ कोटींची...सोलापूर ः राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग...
कर्जमाफीतील पाचर ऊस उत्पादकांच्या मुळावरमुंबई : कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे नियमित...
लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावीपुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा...