Agriculture news in Marathi, Monsoon, rain, water discharge form Ujani dam | Agrowon

उजनीतून सोडले भीमा नदीत पाणी 
संतोष सिरसट
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास 55 हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येते. दुपारी 12 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये दीड हजार, कालव्यातून 400 तर बोगद्यातून 50 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. धरणात दौंड येथून 42 हजार 627 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. 

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास 55 हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येते. दुपारी 12 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये दीड हजार, कालव्यातून 400 तर बोगद्यातून 50 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. धरणात दौंड येथून 42 हजार 627 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. 

आज दुपारी 12 वाजता धरणात उपयुक्त पाण्याची टक्केवारी 92.15 इतकी होती. धरण 90 टक्‍यांच्या पुढे गेल्यानंतर त्यातून भीमा नदीमध्ये पाणी सोडले जाईल, असे धरण प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सकाळी 11 वाजल्यापासून नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले आहे. दौंड येथील विसर्गामध्ये वाढ होत गेली तर धरणातून नदी, कालवा व बोगद्यामध्ये पाणी सोडण्याचा वेग वाढविला जाण्याची शक्‍यता आहे. संध्याकाळपर्यंत धरणातून जादा प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे. कारण पुणे जिल्ह्यातील धरणातून सकाळी आठ वाजता जवळपास 55 हजार क्‍युसेकने पाणी वेगवेगळ्या नद्यांच्या माध्यमातून उजनी धरणात मिसळत आहे. 
-------- 
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा 
दरम्यान, भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, इंदापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्‍यातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणात मिसळत असलेल्या पाण्यामुळे धरणातून कोणत्याही स्थितीत 15 ते 20 हजार क्‍युसेकने पाणी सोडले जाणार आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात जादा पाऊस झाल्यास या सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ केली जाईल. त्यामुळे भीमा नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सर्व तालुक्‍याच्या तहसीलदारांना दुपारी साडेबारा वाजता इ-मेलद्वारे कळविले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सर्वांच्या प्रयत्नांनीच गोवर्धन उचलला...अतिरिक्त दूध झाल्यास प्रक्रिया वाढविणे, त्यासाठी...
सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट...महाराष्ट्र सध्या दुधाच्या प्रश्नावरून निर्माण...
प्रशासकीय अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय...‘शेतीपूरक व्यवसाय करा त्यातून आर्थिक स्थैर्य...
अतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल :...राज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे....
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...
राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे...राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष...
देशव्यापी शेतकरी संपादरम्यान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने...
हरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....
तापमानात घट, ढगाळ हवामानासह पावसाची शक्...महाराष्ट्राचा पूर्वभाग, मध्य प्रदेश, गुजरात,...
लाल गराच्या संत्रा निर्यात वाढीसाठी... ऑस्ट्रेलियामध्ये आतील गर व रस रक्तासारख्या...
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...पुणे  ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा...
परभणीत लिंबू प्रतिक्विंटल १५०० ते ३०००... परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची... बुलडाणा  : शेततळे हा शाश्वत सिंचनाचा...
नगर जिल्ह्यात पाण्याच्या टॅंकरला ‘... नगर  ः जिल्ह्यात यंदा उशिराने टॅंकरद्वारे...
यवतमाळ जिल्हा बॅंक पीककर्ज देणार फक्‍त...यवतमाळ ः आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील...
नगर जिल्ह्यात ९४ हजार ८४९ क्विंटल हरभरा... नगर  ः जिल्ह्यात नाफेडने सुरू केलेल्या १३...
शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत...  परभणी : हवामान बदलामुळे जगातील सर्वच...
राशी आणि कावेरीला कृषी विभागाची क्‍लीन...नागपूर : गेल्या हंगामात राज्यात विक्रीस बंदी...
पुणे विभागात ‘जलयुक्त’च्या कामांसाठी... पुणे : जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१८-१९ मधील...