माॅन्सून उद्या अंदमानात

माॅन्सून उद्या अंदमानात
माॅन्सून उद्या अंदमानात

पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (शनिवार, ता. २६) अखेरच्या तासापर्यंत अंदमानात तो दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.  साधारणपणे २० मेपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने २३ मेपर्यंत माॅन्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने माॅन्सून येण्यास विलंब होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शनिवारपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होणार आहे.   केरळात साधारणपणे दरवर्षी एक जून रोजी माॅन्सून येतो. मात्र, हवामान विभागाने दोन ते तीन दिवस आधी म्हणजेच २९ मेपर्यंत माॅन्सून केरळमध्ये येण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. परंतु, यंदा वेळेवर हवामान तयार न झाल्यामुळे तो वेळेवर येईल का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगालचा उपसागर व तमिळनाडूच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साधारपणे १.५ आणि ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. मालदीव व कोमोरिन परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ५.८ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  मेकुणू चक्रीवादळ तीव्रता वाढली  अरबी समुद्राच्या नैऋत्येकडे असलेल्या मेकुणू चक्रीवादळीची तीव्रता गुरुवारी (ता. २४) अधिक वाढली. ही तीव्रता आजही कायम राहणार आहे. गुरुवारी ओमानच्या बेटापासून १८० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. सलालाहच्या किनाऱ्याजवळ वारे ४४० किलोमीटर वेगाने वारे थैमान घालत होते. यावेळी हे वारे ताशी १६०-१७० किलोमीटर वेगाने फिरत असून ताशी १९० किलोमीटर वेगाने चक्रीवादळाचे झोत वाहत होते. शनिवारी हे वादळ सलालाहजवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातही वारे १३५ ते १४५ किलोमीटर वेगाने वाहत असून समुद्रातील लाटा खवळून उसळत होत्या. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com