agriculture news in marathi, Monsoon to reach Northeast soon | Agrowon

ईशान्येकडील राज्यांत मॉन्सूनचे आगमन शक्य
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे : अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ३०) कर्नाटकपर्यंत मजल मारली. गुरुवारी (ता. ३१) मॉन्सूनची उत्तर सीमा कायम होती. तर बंगालच्या उपसागरात पोषक स्थिती असल्याने मॉन्सून शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तर रविवारी (ता. ३) अरबी समुद्रातून मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुणे : अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ३०) कर्नाटकपर्यंत मजल मारली. गुरुवारी (ता. ३१) मॉन्सूनची उत्तर सीमा कायम होती. तर बंगालच्या उपसागरात पोषक स्थिती असल्याने मॉन्सून शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तर रविवारी (ता. ३) अरबी समुद्रातून मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे बुधवारी (ता. ३०) माॅन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली. कर्नाटकमधील शिराळी, हसन, म्हैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. देशाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. ३) प्रगती करण्याची शक्यता असून, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
बंगालच्या उपसागरातून मॉन्सून ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होणार असून, शुक्रवारी या भागात मॉन्सून हजेरी लावणार आहे. तर ६ जूननंतर महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस जोर धरणार असून, ६ ते ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात माॅन्सून पोचणे होणे शक्य आहे. अाग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेशपासून, पूर्व विदर्भ, तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...