agriculture news in marathi, Monsoon to reach south konkan soon | Agrowon

तळ कोकणात मॉन्सूनची प्रगती शक्य
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ६) दक्षिण अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेशातील रायलसीमा आणि सीमांध्रच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. आज (ता. ७) माॅन्सून महाराष्ट्रातील तळ कोकणात पोचण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता. ८) राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. सोमवारी (ता. ४) संपूर्ण तमिळनाडू, कर्नाटकचा आणखी काही भाग, तसेच आंध्र प्रदेशचा दक्षिण भागापर्यंत मजल मारली होती. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ६) दक्षिण अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेशातील रायलसीमा आणि सीमांध्रच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. आज (ता. ७) माॅन्सून महाराष्ट्रातील तळ कोकणात पोचण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता. ८) राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. सोमवारी (ता. ४) संपूर्ण तमिळनाडू, कर्नाटकचा आणखी काही भाग, तसेच आंध्र प्रदेशचा दक्षिण भागापर्यंत मजल मारली होती. 

मंगळवारी मात्र मॉन्सूनने आणखी वाटचाल न केल्याने दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील शिरळी, चित्रदुर्ग आणि अांध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील आराेग्यवरम, श्रीहरिकोटापर्यंतची सीमा कायम होती. बुधवारी मॉन्सूनने उत्तरेकडील प्रवास सुरू करत अांध्र प्रदेशच्या कर्नूल, नरसापूर, मच्छलीपट्टणमपर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. तर दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील शिरळी, चित्रदुर्गपर्यंतची माॅन्सूनची सीमा बुधवारी कायम होती. 

आज (गुरुवारी) सकाळपर्यंत माॅन्सून कर्नाटक, रायलसीमाचा उर्वरित भाग व्यापून मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा, तेलंगणाच्या काही भागांत दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. तर शुक्रवारपर्यंत (ता. ८) महाराष्ट्र, तेलंगणाच्या आणखी काही भागांत माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. ११) संपूर्ण महाराष्ट्र, अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आेडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत मॉन्सून पोचण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

कमी दाब क्षेत्राचे संकेत 
बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात शुक्रवारी (ता. ८) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. शनिवारपर्यंत (ता. ९) या कमी दाबक्षेत्राची तीव्रता वाढून ते वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम मेघालयात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर ९ ते १० जूनदरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहून समुद्र खवळणार आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...