agriculture news in marathi, Monsoon to reach south konkan tommorrow | Agrowon

मॉन्सून उद्या तळकोकणात; आंध्र प्रदेशपर्यंत मारली मजल
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) उत्तरेकडील वाटचालीस वेग धरला अाहे. सोमवारी (ता. ४) सलग दुसऱ्या दिवशी प्रगती करत माॅन्सूनने संपूर्ण तमिळनाडू, कर्नाटकचा आणखी काही भाग, तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये आणखी वेगाने मार्गक्रमण करून मॉन्सून तळकोकणापर्यंत पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) उत्तरेकडील वाटचालीस वेग धरला अाहे. सोमवारी (ता. ४) सलग दुसऱ्या दिवशी प्रगती करत माॅन्सूनने संपूर्ण तमिळनाडू, कर्नाटकचा आणखी काही भाग, तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये आणखी वेगाने मार्गक्रमण करून मॉन्सून तळकोकणापर्यंत पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बुधवारी (३० जून) कर्नाटकच्या किनारपट्टीसह दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत धडक देणाऱ्या मॉन्सूनची अरबी समुद्रातील वाटचाल काहीशी मंदावली होती. त्यानंतर रविवारी (ता. ३) मॉन्सूनने पुन्हा गती घेत कर्नाटक आणि तमिळनाडूचा आणखी काही भाग व्यापला होता, तर सोमवारी (ता. ४) तमिळनाडूचा संपूर्ण भाग व्यापून, दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील शिरळी, चित्रदुर्ग आणि अांध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील आराेग्यवरम, श्रीहरिकोटापर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. 

पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने मॉन्सून बुधवारपर्यंत (ता. ६) दक्षिण कोकण, गोवा, रायलीसीमा, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगतचा भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे, तर शनिवारपर्यंत (ता. ९) मॉन्सून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पोचेल. त्यांनतर वेगाने प्रगती होत सोमवारपर्यंत (ता. ११) संपूर्ण महाराष्ट्र, अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आेडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत मॉन्सून धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

 बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
बांगलादेश आणि पश्‍चिम बंगाल परिसरामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात शुक्रवारी (ता. ९) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस कमी दाब क्षेत्र पोषक ठरणार आहे. अरबी समुद्रातही कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती, तसेच कर्नाटक आणि तमिळनाडू दरम्यान समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर वाऱ्यांचे पूर्व- पश्‍चिम जोडक्षेत्र असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...