agriculture news in Marathi, Monsoon return from country, Maharashtra | Agrowon

संपूर्ण देशातून मॉन्सून परतला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता. २१) संपूर्ण देशातून परतल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रासह बुहतांशी भागांतून माघारी फिरल्यानंतर माॅन्सूनची परतीची वाटचाल तब्बल दोन आठवडे थांबली होती. साधारणत: १५ ऑक्टोबर रोजी देशातून माघार घेणाऱ्या माॅन्सूनने यंदा २१ ऑक्टोबरपर्यंत देशात मुक्काम केला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये शुक्रवारपासून (ता. २६) ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होणार अाहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता. २१) संपूर्ण देशातून परतल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रासह बुहतांशी भागांतून माघारी फिरल्यानंतर माॅन्सूनची परतीची वाटचाल तब्बल दोन आठवडे थांबली होती. साधारणत: १५ ऑक्टोबर रोजी देशातून माघार घेणाऱ्या माॅन्सूनने यंदा २१ ऑक्टोबरपर्यंत देशात मुक्काम केला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये शुक्रवारपासून (ता. २६) ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होणार अाहे.

यंदा राजस्थानातून २९ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीची वाटचाल सुरू केली. परतीचा प्रवास वेगाने करत आठ दिवसांत (६ सप्टें) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागांतून वारे परतले. त्यानंतर बंगालच्या उपसागरातील तितली आणि अरबी समुद्रात आलेल्या लुबन चक्रीवादळामुळे माॅन्सूनची परतीची वाटचाल थांबली होती. मॉन्सून राज्यातून परतल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजांसह पावसाने हजेरी लावली. केरळ, कर्नाटकमध्येही पावसाचा जोर वाढला हाेता. रविवारी मॉन्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये मॉन्सून २८ ऑक्टोबर रोजी आणि गतवर्षी (२०१७) २५ ऑक्टोबर रोजी मॉन्सून परतला होता. 

उत्तर अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र
उत्तर अंदमान समुद्र आणि म्यानमारच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तरेकडे सरकत असलेल्या या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आज (ता. २२) वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. २२) पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...
भातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...
'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...
शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...
दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...
कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...