agriculture news in Marathi, monsoon on return journey, Maharashtra | Agrowon

मॉन्सून परतीच्या प्रवासावर
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) शनिवारी (ता.२९) राजस्थानातील मुक्काम हलवून परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. पश्‍चिम राजस्थान, गुजरातमधील कच्छ काही भाग आणि उत्तर अरबी समुद्रातून माॅन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यंदा सर्वसाधारण वेळेच्या १६ दिवस आधी देश व्यापणाऱ्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास तब्बल एक महिना उशिराने सुरू झाला. २९ जून रोजी देशभरात पोचलेल्या माॅन्सूनने तब्बल तीन महिने राजस्थानात मुक्काम केला. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) शनिवारी (ता.२९) राजस्थानातील मुक्काम हलवून परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. पश्‍चिम राजस्थान, गुजरातमधील कच्छ काही भाग आणि उत्तर अरबी समुद्रातून माॅन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यंदा सर्वसाधारण वेळेच्या १६ दिवस आधी देश व्यापणाऱ्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास तब्बल एक महिना उशिराने सुरू झाला. २९ जून रोजी देशभरात पोचलेल्या माॅन्सूनने तब्बल तीन महिने राजस्थानात मुक्काम केला. 

यंदाच्या हंगामात मॉन्सूनने तीन दिवस आधी ३० जून रोजी संपूर्ण केरळ व्यापून कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या भागात प्रगती केली. ८ जून रोजी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात एकाच दिवशी वारे दाखल झाले. त्यानंतर ‘मेडन जुलिअन ऑस्सिलेशन’ ही हवामान स्थिती प्रतिकूल झाल्याने विषुववृत्ताकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह खंडीत होत मॉन्सूनची वाटचाल थांबली. त्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी २३ जून रोजी मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, कोकणातून वाटचाल सुरू केली. २७ जून रोजी मोठा टप्पा पूर्ण करून देशाच्या बहुतांशी भागात पोचलेल्या मॉन्सूनने २९ जून रोजी देश व्यापला. साधारणत: १५ जुलै रोजी संपूर्ण देशात सर्वदूर पोचतो. 

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार माॅन्सून १ सप्टेंबर रोजी राजस्थानतून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र यंदा माॅन्सून एक महिना उशिराने माघारी फिरला आहे. मॉन्सूनचे देशभरातील अस्तित्व दर्शविणारा कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) १७ सप्टेंबर रोजी निवळून गेला. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘दाये’ च्रकीवादळ घोंगावत होते. हे वादळ राजस्थानकडे सरकल्याने देशभर मॉन्सूनचे अस्तित्व कायम राहिले.

मात्र ‘दाये’ विरून गेल्यानंतर राजस्थानातील बाष्प कमी होऊन हवामान कोरडे झाले. या भागात हवेचे दाब वाढून वाऱ्यांची दिशा बदलली. त्यानंतर शनिवारी (ता. २९) माॅन्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्याचे जाहीर करण्यात आले. मंगळवारपर्यंत (ता.२) मॉन्सून काही भागातून माघारी फिरण्याची शक्यता आहे.  

ईशान्य मॉन्सून हंगामात सर्वसाधारण पाऊस
नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) देशभरातून परतल्यानंतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मॉन्सून वाऱ्यांमुळे पाऊस सुरू होतो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक या राज्यांत आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाऊस पडतो. तमिळनाडूमध्ये वर्षभरातील सरासरी ४८ टक्के पाऊस हा ईशान्य मॉन्सून हंगामात होतो. १९५१ ते २००० या कालावधीतील सरासरीनुसार या हंगामात ३३२.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या ८९ ते १११ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या काही वर्षांतील माॅन्सूनची राजस्थानातील परतीची सुरवात

वर्ष  परतीची सुरवात
२०११  २३ सप्टेंबर
२०१२    २४ सप्टेंबर
२०१३ ९ सप्टेंबर
२०१४ २३ सप्टेंबर
२०१५  ४ सप्टेंबर
२०१६   १५ सप्टेंबर
२०१७  २७ सप्टेंबर
२०१८   २९ सप्टेंबर

 

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...