agriculture news in marathi, monsoon return journey will start tomorrow, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनचा उद्यापासून परतीचा प्रवास
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) राजस्थानमधून माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार झाली आहे. राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास उद्यापासून (ता.३०) सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरू असून, आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) राजस्थानमधून माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार झाली आहे. राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास उद्यापासून (ता.३०) सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरू असून, आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात सध्या वादळी पावसाने हजेरी लावली असून, सकाळी कडक ऊन, दुपारी उकाडा, त्यापाठोपाठ ढग गोळा होऊन सायंकाळनंतर जोरदार पाऊस असे हवामान आहे. रात्रीच्या वेळीही उकाड्यात वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उद्यापासून (ता. ३०) विदर्भ, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग) : 
कोकण : दोलखांब ४५, सरळ ४२, उरण २३, पेण ४५, हमारपूर ६१, कासू ३०, रोहा २१.
मध्य महाराष्ट्र : ब्राह्मणगाव २५, बोरगाव ३६, खडकाळा २२, जुन्नर २५, कुडे २०, कडूस २४, महाबळेश्‍वर ३५, चंदगड ५१, नारंगवाडी ३६, कोवाड २२. 
मराठवाडा : केदारखेडा १४, जालना शहर ४१, डाळिंब १९.
विदर्भ : कोलारा १२, मेरा ३३, वाशीम १३, कोंढळा १४, चिखलदरा २२, महागाव २३.

मॉन्सूनच्या प्रवासास पोषक स्थिती
मॉन्सूनच्या प्रवाहातील बाष्प कमी झाल्याने गेले काही दिवस राजस्थानसह देशाच्या वायव्य भागात कोरडे हवामान अाहे. या भागात हवेचा दाबही वाढू लागला असून, वाऱ्यांची दिशा बदलू लागली आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत (ता. ३०) मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यानंतर मजल दरमजल करत मॉन्सून देशाच्या दक्षिणेकडील भागातून परत जाणार आहे. या कालावधीमध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, महाराष्ट्रासह मध्य भारतातील राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांवर समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 

 

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...