मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू...
संदीप नवले
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

यंदा परतीचा पाऊस गुरुवारी सुरू होण्याचा अंदाज होता; परंतु एक दिवस आधी परतीचा पाऊस सुरू झाला आहे. एकंदरीत परतीच्या पावसास थोडा उशीर झाला असला, तरी राज्यात काही ठिकाणी हा पाऊस चांगला होईल. 
 - ए. के. श्रीवास्तव,
वैज्ञानिक, 
हवामान विभाग, पुणे 

पुणे : राजस्थानच्या पश्चिम भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे बुधवार (ता. २७) पासून मॉन्सूनने पंजाब, हरियाना व कच्छ आणि पश्चिम राजस्थानच्या बहुतांशी भागातून परतण्यास सुरवात केल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राजस्थानच्या पश्चिम भागातून गुरुवारी (ता. २८) परतण्याचा अंदाज हवामान विभागाने रविवारी (ता. २४) दिला होता; परंतु अंदाजाच्या एक दिवस आधीच मॉन्सून परतण्यास सुरवात झाली आहे. 

सध्या राजस्थानच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असून, कमाल तापमानात घट होण्यास सुरवात झाली आहे. देशात साधारणपणे एक सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास होण्याचा अंदाज असतो. गेल्या आठ दिवसांपूर्वी देशाच्या वायव्ये भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. काही ठिकाणी हलका स्वरूपाच्या सरीही बरसत होत्या; परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून पाऊस उघडल्याने परतीच्या पावसास सुरवात झाली आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, उत्तराखंड, गुजरात, झारखंड या भागातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे परतीच्या पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. 

परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहू लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागात पाऊस थांबला असून, उत्तरेकडील हवेचा दाब वाढलेले आहे. दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरवात झाली. ईशान्येकडील हवेचा दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येऊ लागले आहे. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

हवामान विभागाचे वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागातही परतीचा चांगला पाऊस पडतो. कोकणात परतीचा पाऊस कमी असतो; परंतु दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात ईशान्येकडील पाऊस नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत सुरू असतो.

मॉन्सूनचा दहा वर्षांतील परतीचा प्रवास 
  ३० सप्टेंबर २००७
  २९ सप्टेंबर २००८ 
  २६ सप्टेंबर २००९ 
  २७ सप्टेंबर २०१० 
  २३  सप्टेंबर २०११
  २४ सप्टेंबर २०१२ 
  ९ सप्टेंबर २०१३ 
  २३ सप्टेंबर २०१४
  ४ सप्टेंबर २०१५ 
  १५ सप्टेंबर २०१६

यंदा परतीचा पाऊस गुरुवारी सुरू होण्याचा अंदाज होता; परंतु एक दिवस आधी परतीचा पाऊस सुरू झाला आहे. एकंदरीत परतीच्या पावसास थोडा उशीर झाला असला, तरी राज्यात काही ठिकाणी हा पाऊस चांगला होईल. 
- ए. के. श्रीवास्तव,
वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे 

राज्यात ऑक्टोबर ‘हीट’ची चाहूल 
येत्या रविवार (ता. १) पर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने राज्यात ऑक्टोबर ‘हीट’ची चाहूल लागली आहे. गुरुवारी (ता. २८) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...