agriculture news in marathi, monsoon return till Gujrat and Uttar pradesh, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनची उत्तर प्रदेश, गुजरातपर्यंत माघार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

पुणे ः माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पोषक स्थिती असल्याने आणखी काही भागातून माघार घेतली आहे. सोमवारी (ता. १) राजस्थानचा उर्वरित भाग, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेशातून माॅन्सून परतला आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम, पूर्वच्या संपूर्ण भागातून आणि गुजरात व उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून माॅन्सूनने माघार घेतली आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे ः माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पोषक स्थिती असल्याने आणखी काही भागातून माघार घेतली आहे. सोमवारी (ता. १) राजस्थानचा उर्वरित भाग, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेशातून माॅन्सून परतला आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम, पूर्वच्या संपूर्ण भागातून आणि गुजरात व उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून माॅन्सूनने माघार घेतली आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरापासून ते पूर्वमध्ये अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटकच्या काही काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, अरबी समुद्र, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांत अजून दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस पडणार आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाची उघडीप असल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. कमाल तापमान वाढू लागले असून, ‘आॅक्टोबर हीट’ ही चांगलीच जाणवू लागली आहे. सोमवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जळगाव येथे ३६.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मात्र, दुपारनंतर अचानक हवामानात बदल होत असून ढग गोळा होत आहेत. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारी पुणे शहराच्या काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. रविवारी (ता. ३०) कोकणातील सावंतवाडी, वैभववाडी, वेंगुर्ला येथे २० मिलिमीटर, चिपळूण, म्हसळा, केपे येथे दहा मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील खेड येथे तीस मिलिमीटर, पुण्यातील लोहगाव परिसरात वीस, उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडला.

सोमवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः
पुणे ३३.६, जळगाव ३६.७, कोल्हापूर ३१.९, महाबळेश्वर २६.१, मालेगाव ३६.२, नाशिक ३३.८, सांगली ३१.६, सातारा ३२.५, सोलापूर ३६.४, मुंबई ३६.६, सांताक्रूझ ३६.१,
अलिबाग ३४.८, रत्नागिरी ३३.६, औरंगाबाद ३५.०, परभणी ३६.०, नांदेड ३५.५, अकोला ३५.९, अमरावती ३५.६, बुलडाणा ३२.४, चंद्रपूर ३५.४, गोंदिया ३४.२, नागपूर ३४.६,
वर्धा ३५.५, यवतमाळ ३५.५.

अनेक ठिकाणी जोर वाढणार
अरबी समुद्र आणि कर्नाटकच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाल्यामुळे परतीचा पाऊस वेगाने दक्षिणेकडे सरकत आहे. येत्या गुरुवार (ता. ४) पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात जोर वाढणार असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. ५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

इतर अॅग्रो विशेष
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...