agriculture news in marathi, Monsoon session of Parliament from July 18 to Aug 10 | Agrowon

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै ते १० ऑगस्ट
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

नवी दिल्ली ः संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करणे, तोंडी तलाक विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यास सरकारचे प्राधान्य असेल.

नवी दिल्ली ः संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करणे, तोंडी तलाक विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यास सरकारचे प्राधान्य असेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज विषय समितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर संसदीय कामाकाज मंत्री अनंतकुमार यांनी अधिवेशनाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. संसद भवन परिसरात गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पावसाळी अधिवेशनात शनिवार आणि रविवार वगळता अन्य सुट्या नसल्यामुळे दोन्ही सभागृहांच्या १८ बैठका होतील. त्यात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर केले जाईल; तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे १२५वी घटनादुरुस्ती विधेयक, वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित राष्ट्रीय आयोग स्थापनेचे विधेयक, तोंडी तलाकच्या प्रथेपासून मुस्लिम महिलांना कायद्याने सुरक्षा देणारे विधेयक, याव्यतिरिक्त ग्राहक हक्क संरक्षण विधेयक, शिक्षण हक्क कायदा आणि राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेशी (एनसीईआरटी) संबंधित विधेयक, ट्रान्सजेंडर विधेयक ही विधेयके मंजुरीसाठी सभागृहात मांडली जातील. अधिवेशन सुरळीत चालावे आणि सार्थक कामकाज व्हावे, यासाठी विरोधकांच्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे अनंतकुमार यांनी सांगितले.

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन अविश्‍वास प्रस्तावावरून झालेल्या गदारोळामुळे वाया गेले होते. तेलुगू देसम पक्षाने सत्ताधारी "एनडीए'ला सोडचिठ्ठी देऊन थेट सरकारवर अविश्‍वास आणला होता; तर वायएसआर कॉंग्रेस, कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षानेही अविश्‍वास ठराव आणला होता. आता पावसाळी अधिवेशनात अविश्‍वास ठरावाची पुनरावृत्ती झाल्यास सरकारची काय तयारी आहे, असे विचारले असता, विरोधी पक्षांकडून उपस्थित होणाऱ्या सर्व मुद्द्यांना उत्तर देण्याची मोदी सरकारची तयारी असल्याचे अनंतकुमार यांनी स्पष्ट केले.

सरकारला कोणताही विषय टाळायचा नाही आणि अविश्‍वास ठरावासह सर्व मुद्द्यांवर चर्चेची तयारी आहे.
- अनंतकुमार, संसदीय कामकाज मंत्री

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...