agriculture news in Marathi, monsoon steady progress, Maharashtra | Agrowon

मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली; गुरुवारपर्यंत उत्तर अंदमानात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला. मंगळवारपर्यंत (ता. २१) उत्तर अंदमानपर्यंत मॉन्सूनची वाटचाल होण्याचा अंदाज होता. मात्र, मॉन्सूनची अंदमानातील प्रगती काहीशी मंदावली असून, गुरुवारपर्यंत (ता. २३) मॉन्सून उत्तर अंदमानात पोचण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला. मंगळवारपर्यंत (ता. २१) उत्तर अंदमानपर्यंत मॉन्सूनची वाटचाल होण्याचा अंदाज होता. मात्र, मॉन्सूनची अंदमानातील प्रगती काहीशी मंदावली असून, गुरुवारपर्यंत (ता. २३) मॉन्सून उत्तर अंदमानात पोचण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

हवामान विभागाने १८ ते १९ मेपर्यंत मॉन्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज वर्तविलेला होता. अंदाजानुसार सर्वासाधारण आगमनाच्या (ता. २०) दोन दिवस अगोदर शनिवारी (ता. १८) मॉन्सून अंदमानात पोचला आहे. मंगळवारपर्यंत बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, उत्तर अंदमान बेटांवर मॉन्सून पोचण्याची पोषक स्थिती असल्याचेही हवामान विभागाने यापूर्वी स्पष्ट केले होते. सोमवारी अगमनानंतरच्या तिसऱ्या दिवशी मॉन्सूनची अंदमानातील वाटचाल जैसे थे असल्याचे सांगण्यात आले. 

गुरुवारपर्यंत प्रगती शक्य
सोमवारी (ता. २०) मॉन्सून गुरुवारपर्यंत (ता. २३) अंदमानात प्रगती करेल, असे जाहीर करण्यात आले. सोमवारी दुपारी बंगालच्या उपसागरात ढग गोळा होत होते. तर, अंदमान बेटांवर अंशत: ढगाळ हवामान होते. यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे, यात आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. तर, केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल निश्चित होणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...