agriculture news in marathi, Monsoon will affected by al Nino says American scientist | Agrowon

यंदा सरासरीपेक्षा कमी ‘मॉन्सून’? अमेरिकन हवामान तज्ज्ञांचा अंदाज
वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुणे : प्रशांत महासागरात जून महिन्यानंतर एल निनो स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. भारतातील माॅन्सूनच्या पावसावर त्याचा परिणाम होऊन सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. आॅस्ट्रेलियाच्या पूर्व भागातील धान्य उत्पादक प्रदेशातही पावसावर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

पुणे : प्रशांत महासागरात जून महिन्यानंतर एल निनो स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. भारतातील माॅन्सूनच्या पावसावर त्याचा परिणाम होऊन सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. आॅस्ट्रेलियाच्या पूर्व भागातील धान्य उत्पादक प्रदेशातही पावसावर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

प्रशांत महासागरात असलेली ला निना स्थिती निवळत असून, हवामान सर्वसाधारण होत आहे. त्यामुळे वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात एल निनो स्थिती तयार होण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेतील वरिष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ कायल टॅप्ली यांनी नमुद केले आहे. एल निनो स्थितीमुळे जून महिन्यानंतर अशिया खंडाच्या काही भागांत हवामान कोरडे राहणार आहे. तर दक्षिण अमेरिकेत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. इतरही हवामान तज्ज्ञांनी वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात एल निनो तयार होण्यास दुजोरा दिला आहे.

देशातील माॅन्सून हंगामाचा विचार करता गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मध्य आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये पिकांसाठी आवश्‍यकतेपेक्षा कमी पाऊस पडला होता. भारतीय हवामान विभागाने ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होताा. मात्र जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या कालावधीत ९५ टक्के पाऊस पडला होता. यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतातील सोयाबीन, भुईमूग, कापूस या पिकांवर परिणाम होणार आहे. २०१७ मधील उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे आॅस्ट्रेलियातील गहू उत्पादनात गेल्या दहा वर्षांत प्रथमच जवळपास ३० टक्क्यांची घट झाली असल्याचे टपली यांनी नमूद केले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...