agriculture news in marathi, Monsoon withdraw from half of state, Maharashtra | Agrowon

निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (माॅन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) देशाच्या बहुतांशी भागातून माॅन्सूनने माघार घेतली अाहे. तर संपूर्ण विदर्भ, खाणदेश, उत्तर कोकणासह जवळपास निम्मा महाराष्ट्रातून मॉन्सून परतला अाहे. डहाणू, वाशीम गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत वाऱ्यांनी परतीचा टप्पा पूर्ण केला आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (माॅन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ५) देशाच्या बहुतांशी भागातून माॅन्सूनने माघार घेतली अाहे. तर संपूर्ण विदर्भ, खाणदेश, उत्तर कोकणासह जवळपास निम्मा महाराष्ट्रातून मॉन्सून परतला अाहे. डहाणू, वाशीम गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत वाऱ्यांनी परतीचा टप्पा पूर्ण केला आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनची परतीचा वेग वाढला आहे. २९ सप्टेंबर रोजी पश्‍चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासला निघालेल्या माॅन्सूनने अवघ्या सहा दिवसांमध्ये वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या अनेक भागांचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) पाऊस पडतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधून वारे माघारी फिरताच संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण नियोजित वेळेनुसार १५ ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशातून परत जातो. 

शुक्रवारी मॉन्सूनने मोठा टप्पा पार करत ईशान्य भारत, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, गुजरात राज्याच्या संपूर्ण भागासह छत्तीसगडचा बहुतांशी भाग, उत्तर बंगालचा उपसागर आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून काढता पाय घेतला आहे. यंदा जवळपास एक महिना उशिराने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर कमी कालावधीत मॉन्सून देशातून परतण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपूर्ण देशातून परतण्याचे संकेत असून, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

कमी दाब क्षेत्र होतय तीव्र
अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि मालदिव बेटांच्या परिसरावर शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढून उद्यापर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. हे चक्रीवादळ आेमानच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे. मंगळवापर्यंत (ता. ९) तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही सोमवापर्यंत (ता. ८) आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

कोरड्या हवामानाचा अंदाज  
राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत अाहे. सोमवारपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, राज्याच्या उर्वरित भागात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे.  

इतर अॅग्रो विशेष
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...