agriculture news in marathi, monsoon withdraw from state, Maharashtra | Agrowon

यंदा मॉन्सूनने राज्याला लवकरच अलविदा केले...
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. ६) संपूर्ण राज्यातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवासाला वेग आला आहे. ता. २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर आठ दिवसांत देशाच्या बहुतांशी भागातून वारे परतले. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. शनिवारी (ता. ६) संपूर्ण राज्यातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवासाला वेग आला आहे. ता. २९ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर आठ दिवसांत देशाच्या बहुतांशी भागातून वारे परतले. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

यंदाच्या हंगामात ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने २३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर जवळपास चार महिने मॉन्सूनचे राज्यात अस्तित्व होते.  शुक्रवारी (ता. ५) निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवारी (ता. ६) संपूर्ण राज्यातून मॉन्सून परतला अाहे. गेल्या आठ वर्षांची वाटचाला पाहता यंदा मॉन्सूनने राज्याला लवकरच अलविदा केला आहे. गेल्या वर्षी (२०१७) आणि २०११ मध्ये २४ अॉक्टोबर रोजी, २०१३ मध्ये २१ ऑक्टोबर, २०१२ व २०१५ मध्ये १५ ऑक्टोबर, २०१४ मध्ये १८ ऑक्टोबर तर २०१६ मध्ये १६ आॅक्टोबर रोजी मॉन्सून महाराष्ट्रातून परतला हाेता.
 
अरबी समुद्रात तयार होत असलेल्या ‘चक्रीवादळामुळे माॅन्सूनची परतीचा वेग वाढला आहे. शनिवारी मॉन्सूनने छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणाच्या संपूर्ण भाग, अांध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, रायलसीमा आणि कमर्नाटच्या आणखी काही भागांतून माघार घेतली. सोमवारी (ता. ८) दक्षिण भारतातील राज्यांसह संपूर्ण देशातून मॉन्सून परतणार असून, या भागात ईशान्य माेसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) पाऊस सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

चक्रीवादळाचे संकेत
अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि मालदीव बेटांच्या परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, शनिवारी त्याचे ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले. अोमानच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकणारी ही प्रणाली आणखी तीव्र होत असून, उद्या (ता. ८) सकाळपर्यंत ‘चक्रीवादळ’ तयार होण्याचे संकेत आहे. मध्य अरबी समुद्रात ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळून उचं लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातही सोमवापर्यंत (ता. ८) आणखी एक कमी दाबक्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...