परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची पाच क्विंटल उत्पादकता

मगू आणि उडीद
मगू आणि उडीद

परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ४ क्विंटल ३० किलो (एकरी १.७२ क्विंटल) आणि उडदाची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ४ क्विंटल ९० किलो (एकरी १.९६ क्विंटल) आली आहे. संयुक्त पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात यंदा मुगाची २४ हजार ३३८ हेक्टवर पेरणी झाली होती. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मुगाचे एकूण ३२४ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३२० पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षांचे विश्लेषण करण्यात आले. जिल्ह्याची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ४.३० क्विंटल (एकरी १.७२ क्विंटल) आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी (२०१७) मध्ये मुगाची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता २.१५ क्विंटल (एकरी ८६ किलो) आली होती. २०१२-१६ या पाच वर्षांत सरासरी उत्पादकता ३.८१ क्विंटल आली होती. यंदा मुगाची उत्पादकता सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ५.५४ क्विंटल तर मानवत तालुक्यात सर्वात कमी ३.२५ क्विंटल आली आहे.  जिल्ह्यात यंदा उडदाची ८ हजार १४९ हेक्टवर उडदाची पेरणी झाली होती. सर्व नऊ तालुक्यांमध्ये उडदाच्या १७२ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १५८ प्रयोगाच्या विश्लेषणावरून जिल्ह्याची उडदाची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ४.९० क्विंटल (एकरी १.९६ क्विंटल) आली असल्याचे आढळून आले आहे. गंगाखेड तालुक्याची उत्पादकता सर्वाधिक ८.०१ क्विंटल तर पाथरी तालुक्याची सर्वात कमी २.८७ क्विंटल आली आहे. गतवर्षी (२०१७) उडदाची उत्पादकता २.९१ क्विंटल (एकरी १.१६ क्विंटल) आली होती. २०१२ ते २०१६ या पाच वर्षांत प्रतिहेक्टरी २.९८ क्विंटल आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com