नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडीद खरेदीसाठी ११ केंद्रे
माणिक रासवे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

परभणी : राज्यात नाफेडतर्फे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने २०१७-१८ च्या खरेदी हंगामात मूग, उडीद, तूर आदी कडधान्य तसेच सोयाबीन आदी शेतमालाची खरेदी प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. मंगळवारपासून (ता.३) नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ११ ठिकाणांच्या केंद्रांवर नोंदणी सुरू झाल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

परभणी : राज्यात नाफेडतर्फे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने २०१७-१८ च्या खरेदी हंगामात मूग, उडीद, तूर आदी कडधान्य तसेच सोयाबीन आदी शेतमालाची खरेदी प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. मंगळवारपासून (ता.३) नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ११ ठिकाणांच्या केंद्रांवर नोंदणी सुरू झाल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

तेलबिया आणि कडधान्याची खरेदी प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना संबंधित खरेदी विक्री केंद्रावर नोंदणी करावी लागणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, देगलूर एकूण ३, परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, गंगाखेड येथील तालुका खरेदी-विक्री संघाकडे; तसेच जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती एकूण ५, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ), वसमत एकूण ३, तीन जिल्ह्यांतील एकूण ११ ठिकाणी संबंधित बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना २०१७-१८ मध्ये पेरणी केलेल्या सर्व पिकांची नोंदणी करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये पेरणी केलेल्या क्षेत्रानुसार विविध पिकांचे क्षेत्र नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्याची मूळ प्रत, आधार कार्ड, बॅंक खाते पासबुक पहिल्या पानाची सत्यप्रत, मोबाईल क्रमांक माहितीची खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांची एकदाच नोंद करावी लागणार आहे. आधारभूत किंमत दराने खरेदी सुरू होईल त्या वेळी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस पाठवून कळविण्यात येईल.

खरेदी केंद्रांवर धान्य कधी विक्रीसाठी आणावे यासाठीदेखील एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. सुरवातीला मूग, उडीद या शेतमालाची खरेदी मंजुरी मिळाल्यास सुरू करण्यात येईल. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी २०१७-१८ मध्ये पेरणी केलेल्या सर्व पिकांची नोंदणी संबधित खरेदी केंद्रावर करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हा विपणन अधिकारी आर. डी. दांड आणि परभणी, हिंगोलीचे जिल्हा विपणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...