पीकविमा योजनेसाठी ९० लाखांहून अधिक अर्ज

पीकविमा
पीकविमा

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. मंगळवारी (ता.३१) रात्री बारा वाजेपर्यंत ९० लाखांहून अधिक अर्ज भरण्यात आले असून, शेतकऱ्यांची अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे.   ‘‘मंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले. रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा ९० लाखांच्या पुढे गेला. यंदा ऑनलाइन अर्ज भरण्यात शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.   आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या मदतीने राज्याच्या विविध भागांमध्ये मंगळवारी रात्री बारावाजेपर्यंत अर्ज भरले जात होते. सर्व्हरवर ताण आल्यामुळे बुधवारी देखभालीसाठी ऑनलाइन प्रणाली काही तास बंद ठेवण्यात आली होती.  राष्ट्रीयीकृत, व्यापारी व जिल्हा बँकांनी अनेक शेतकऱ्यांचा विमा हप्ता रोख, ऑनलाइन, डिमांड ड्रॉफ्टद्वारे जमा करून घेतला आहे. त्यानंतर विमा हप्ता भरलेले अर्ज अपलोड करण्यासाठी वेबसाइट चालू ठेवण्यात आलेली आहे. त्याचा अॅक्सेस मात्र शेतकऱ्यांना नसेल.   गेल्या हंगामात राज्यात १८.८९ लाख कर्जदार तर ६४.६९ लाख बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. यंदा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी निश्चित किती अर्ज भरले याची माहिती दुपारी चार वाजेपर्यंत कृषी विभागाच्या सांख्यिकी कक्षाकडे आलेली नव्हती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com