मधपालन संग्रहालयाला साडेआठ हजार पर्यटकांची भेट

मधपालन संग्रहालयाला साडेआठ हजार पर्यटकांची भेट
मधपालन संग्रहालयाला साडेआठ हजार पर्यटकांची भेट

पुणे : वनस्पती व पिकांच्या फुलोऱ्यातून मधमाश्यांमार्फत मिळणाऱ्या मधाचा प्रवास जाणून घेण्यासाठी केंद्रीय मधमाश्या संशोधन व पालन केंद्रातील संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. चार वर्षांत तब्बल आठ हजार ७०५ नागरिकांनी संग्रहालयाला भेट दिली आहे. त्या मार्फत संस्थेकडे संस्थेकडे तब्बल एक लाख ७४ हजार १०० रुपयांचा महसूल जमा झाला. चालू आर्थिक वर्षात जानेवारीअखेर सर्वाधिक तीन हजार ६६१ पर्यटकांनी भेट दिली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाश्या संशोधन व पालन केंद्रात मधमाश्यापालना संदर्भात संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्यास दरवर्षी हजारो विद्यार्थी, शेतकरी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी भेट देतात. यामार्फत त्यांना मधासाठी आवश्यक पराग व एकपुष्पीय वनस्पती, मधमाश्यांचे प्रकार, मधमाश्यापालनाच्या पूर्वीच्या तसेच आधुनिक पद्धती, मधमाश्यांचे शत्रू, मध काढणी यंत्र, मेणपत्रा तयार करण्याची मशिन, मध साठविण्याचे भांडे, तसेच मध काढतेवेळी लागणारी उपकरणे आदींविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी प्रतिव्यक्ती वीस रुपये दर आकारण्यात येत असल्याची माहिती केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  दरम्यान, गेल्या चार वर्षांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यासह सोलापूर, नगर, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव आदी वेगवेगळ्या भागांतील नागरिकांनी येथील संग्रहालयाला भेट दिली आहे. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असून, संस्थेकडे तब्बल १ लाख ७४ हजार १०० रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वर्षनिहाय मधमाशीपालन संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या
 वर्ष  भेट देणाऱ्यांची संख्या जमा महसूल(रुपये) 
 २०१४-१५  १ हजार १८७  २३ हजार ७४०
 २०१५-१६  ९९२  १९ हजार ८४०
 २०१६-१७  २ हजार ८६५  ५७ हजार ३००
 २०१७-१८  ३ हजार ६६१  ७३ हजार २२० (जानेवारी अखेरपर्यंत)  

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्यामुळे गेल्या दोन वर्षांत संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षातॲपिकल्चर प्रोजेक्ट करण्यास सांगण्यात येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना मधमाश्यापालन व संशोधन केंद्राला भेट देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे संग्रहालयाला भेट देण्यामध्ये सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. - सुनील पोकरे, विकास अधिकारी, केंद्रीय मधमाश्या संशोधन व पालन केंद्र  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com