agriculture news in marathi, More than half of sugarcane area affected by white grum, Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात निम्म्याहून अधिक ऊस हुमणीच्या विळख्यात
संदीप नवले
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

माझ्याकडे वीस एकरांवर ऊस आहे. त्यापैकी जवळपास ३० ते ४० टक्केपर्यंत हुमणीमुळे नुकसान झाले आहे. पुढील वर्षी उत्पादनात घट येणार आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.  
- रामचंद्र नागवडे, बाभूळसर, ता. शिरूर, जि. पुणे

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पुरेसा पाऊस न झाल्याने ऊस पिकावर हुमणी अळीने मोठा धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख ७३ हजार ८०१ हेक्टरपैकी निम्म्याहून अधिकक्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. मदतीची अपेक्षा शेतकरी करत असताना शासन पातळीवर मात्र कुठलीही हालचाल नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लवकर पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी एक लाख ४१ हजार ७३० हेक्टरवर आडसाली, सुरू आणि खोडवा उसाच्या लागवडी झाल्या आहेत. यंदाही जवळपास ३२ हजार ७१ हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उसाचे गाळप चालू वर्षी होणार आहे. चालू वर्षी लागवड केलेल्या उसाचे गाळप पुढील हंगामात होईल. परंतु, पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या एक ते दोन महिन्यांपासून ''हुमणी''ने पुरता धुमाकूळ घातला असून, हजारो एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे.

मात्र, इतके मोठे संकट शेतकऱ्यांवर कोसळूनही शासकीय पातळीवर दिसून येत असलेली अनास्था व लोकप्रतिनिधींचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे तालुक्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

वर्ष-दीड वर्ष जपलेला ऊस ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर हुमणीच्या प्रादुर्भावामुळे हातचा जात आहे. तालुक्यातील गावागावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरील उसाचे क्षेत्र हुमणीमुळे उभे वाळून चालले आहे. नुसत्या हातानेही उसाचे अख्खे बेट उपटून निघत आहे. इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

या किडीचा प्रचंड झपाट्याने प्रादुर्भाव होत असल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी तोंडावर आलेल्या गळीत हंगामाची वाट न पाहता चक्क जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून मिळेल त्या भावाने ऊस तोडून देण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनही जे शेतकरी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात गाळपासाठी ऊस पाठवणार आहेत, त्यांच्या वजनात निम्म्यापेक्षाही जास्त घट येण्याचा धोका वाढला आहे. पर्यायाने साखर उत्पादन घटणार असल्याने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरही या संकटाची गडद छाया पडणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

६० टक्क्यांपर्यंत नुकसान
दौड (जि. पुणे) तालुक्यातील नांदुर येथील अप्पासो बबन घुले म्हणाले, की माझ्याकडे दहा ते बारा एकरांवर उसाचे क्षेत्र आहे. तसेच परिसरातही ७० ते ८० टक्के उसाचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या महिन्यापासून ऊस पिकाला हुमणी अळीची चांगलीच लागण झाली आहे. त्यामुळे ५०-६० टक्केपर्यंत नुकसान झाले आहे. जवळपास संपूर्णपणे या रोगाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या परिसरातील जवळपास सर्वच ऊसउत्पादक शेतकऱ्यांची थोड्याफार फरकाने हीच अवस्था असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. 

प्रतिनिधी
मी स्वतः दोन ते तीन दिवसांपूर्वी पुरंदर भागात पाहणी केली. मला अनेक ठिकाणी हुमणीमुळे झालेले नुकसान दिसून आले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना देऊन उपाययोजनासंदर्भात कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे; तसेच हुमणीमुळे प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची माहिती तत्काळ कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

 

इतर अॅग्रो विशेष
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...