agriculture news in marathi, more than one crore farmers has soil health card in state | Agrowon

राज्यात एक कोटीहून अधिक ‘जमीन आरोग्यपत्रिका’धारक'
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018

मुंबई : शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत देशात १२ कोटींहून अधिक ‘जमीन आरोग्य पत्रिका’चे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख ‘जमीन आरोग्य पत्रिका’चे वितरण करण्यात आले आहे. मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात उत्तर प्रदेश देशात प्रथम स्थानावर तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.

मुंबई : शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत देशात १२ कोटींहून अधिक ‘जमीन आरोग्य पत्रिका’चे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख ‘जमीन आरोग्य पत्रिका’चे वितरण करण्यात आले आहे. मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात उत्तर प्रदेश देशात प्रथम स्थानावर तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.

फेब्रुवारी २०१५ सालापासून देशात जमीन आरोग्य पत्रिका ही योजना सुरू करण्यात आली. शेतजमिनीचे आरोग्य कळावे व त्यानुसार पीकपद्धती शेतकऱ्यांनी राबवावी, या उद्देशाने ही योजना अस्तित्वात आली. जमीन आरोग्य पत्रिका योजनेतंर्गत नगर जिल्ह्यात ११ लाख १६ हजार शेतकऱ्यांना १० लाख ११ हजार जमीन आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा दुसऱ्या स्थानावर असून या जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांना ६ लाख २८ हजार जमीन आरोग्य पत्रिकाचे वितरण करण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ८ लाख १३ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, ६ लाख १७ हजार जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण झाले आहे. योजनेत कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्थानावर असून या जिल्ह्यात ५ लाख १७ हजार जमीन आरोग्य पत्रिका वितरित झाले असून जिल्ह्यातील ६ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना कार्डचे वितरण करण्यात अाले अाहे.

योजनेत पुणे जिल्हा पाचव्या स्थानावर असून या जिल्ह्यातील ६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ४ लाख ६३ हजार कार्ड वितरित करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्हा सहाव्या स्थानावर असून जिल्ह्यातील ६ लाख १९ हजार शेतकऱ्यांना ४ लाख ४० हजार कार्डाचे वितरण करण्यात आले आहे. 

देशात १२ कोटींहून अधिक जमीन आरोग्यपत्रिका
फेब्रुवारी २०१५ ते एप्रिल २०१८ या कालावधीत जमीन आरोग्य पत्रिका (सॉइल हेल्थ कार्ड) योजनेचा देशातील १० कोटी ८० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या कालावधीत ३ कोटी ५० लाख मातीचे नमुने तपासण्यात आले तर १२ कोटी ४६ लाख जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे.

इतर बातम्या
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
निलंगा तालुक्‍यात गुऱ्हाळे सुरूनिलंगा, लातूर ः पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने व...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...