agriculture news in marathi, more than six thousant raisins sheds in Nagaj, Sangli | Agrowon

नागज परिसरात सहा हजार बेदाणा शेड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

सांगली : सांगली जिल्ह्यातील नागज (ता. कवठे महंकाळ) येथे साधारणपणे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत चालणाऱ्या व कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या बेदाणा हंगामास सुरवात झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील आगळगाव, शेळकेवाडी, केरेवाडी, घोरपडी, चोरोची आदी गावांतील बेदाणाशेडमध्ये रोजगारी मंडळींची वर्दळ वाढू लागली आहे. या परिसरात सुमारे ६ हजार बेदाणा शेड आहेत. यापैकी या हंगामात ७० ते ८० टक्के बेदाण्याचे शेडमध्ये बेदाणानिर्मिती होण्याची शक्‍यता आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील नागज (ता. कवठे महंकाळ) येथे साधारणपणे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत चालणाऱ्या व कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या बेदाणा हंगामास सुरवात झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील आगळगाव, शेळकेवाडी, केरेवाडी, घोरपडी, चोरोची आदी गावांतील बेदाणाशेडमध्ये रोजगारी मंडळींची वर्दळ वाढू लागली आहे. या परिसरात सुमारे ६ हजार बेदाणा शेड आहेत. यापैकी या हंगामात ७० ते ८० टक्के बेदाण्याचे शेडमध्ये बेदाणानिर्मिती होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सध्या द्राक्षाला सरासरी १५० ते २२५ रुपये प्रति चार किलो असे दर आहेत. त्यामुळे बहुतांश द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष विक्रीसाठी पुढे आले आहेत. 

या भागातील कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, कच्च्या मालाची उपलब्धता आणि जवळपासची बाजारपेठ या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने कवठेमहांकाळ तालुक्‍यात सर्वाधिक बेदाणा उत्पादन होते. तालुक्‍यात बेदाण्याचे सुमारे ६ हजार शेड आहेत. हंगाम सुरू होण्याअगोदर त्याची स्वच्छता केली जाते. सहा हजार शेडपैकी अंदाजे ७० ते ८० टक्के शेडमध्ये बेदाणानिर्मिती केली जाते. या भागात सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा, पलूस, तासगाव या तालुक्‍यांतील द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा तयार करण्यासाठी नागज येथे येतात. चार महिन्यांत चालणाऱ्या या बेदाणा हंगामामध्ये केवळ कवठेमहांकाळच नव्हे तर नजीकच्या जत, तासगाव, आटपाडी, सांगोला या तालुक्‍यांतील तसेच परजिल्हा व परप्रांतीय मजूर महिला-पुरुषांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.

कवठेमहांकाळ व लगतच्या सांगोला तालुक्‍यातील हवामान बेदाणा उद्योगास पोषक आहे. त्यामुळे या तालुक्‍यातील कृषी उत्पन्न तुलनेत कमी असले तरी बेदाणा हंगामातील उलाढाल मात्र सधन भागातील उत्पन्नापेक्षा अधिक असते. द्राक्षापासून बेदाणा निर्माण करण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्‍यातील हवामान अतिशय योग्य आहे. इथल्या कोरड्या व भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या वातावरणात चार किलो द्राक्षापासून सुमारे एक ते दीड किलो बेदाणा तयार होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेदाणानिर्मिती व्यवसाय येथे चालतो. खरे तर हंगामी का असेना या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या बेदाणा व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...