agriculture news in Marathi, more use of fertilizer in jalgoan district, Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात खतांचा सर्वाधिक वापर
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

खतांचा सर्वाधिक वापर व विक्री जळगाव जिल्ह्यात असल्याचे खते मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. यासोबत जळगाव जिल्ह्यात विद्राव्य खते, तणनाशकांचाही वापर वाढत असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

जळगाव ः राज्यात रासायनिक खतांचा जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक वापर झाला आहे. २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात रब्बी व खरिपात मिळून चार लाख चार हजार १४७ मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे. खतांच्या खपासंबंधी औरंगाबाद जिल्हा राज्यात दुसरा असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली आहे. 

तापीकाठावरील रावेर, यावल, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर आणि गिरणा पट्ट्यातील भडगावात केळीखालील ४३ हजार हेक्‍टर क्षेत्र १०० टक्के सुक्ष्म सिंचनाखाली आहे. याच वेळी पूर्वहंगामी कपाशीही दरवर्षी जवळपास ८१ ते ८२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर असते. कपाशी लागवडीत जळगाव जिल्हा मागील चार वर्षे राज्यात पहिला राहिला असून, यंदा चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर कपाशी लागवड आहे. १५ तालुके आणि खरिपाखाली दरवर्षी व्यापणारे सात लाख ७८ हजार हेक्‍टर क्षेत्र, अशा सर्व स्थितीमुळे खतांची मागणी जळगाव जिल्ह्यात जास्त राहिल्याचे निरीक्षण जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोंदविले आहे. 

जसा सरळ, मिश्र खतांचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे, तसा विद्राव्य खतांचा वापरही वाढला आहे. केळी उत्पादक फ्रूट केअर तंत्रज्ञानाकडे वळत असल्याने रावेर, मुक्ताईनगर, यावल आणि चोपडा या तालुक्‍यांमध्ये दरवर्षी जवळपास १० ते साडे १० कोटी रुपयांच्या विद्राव्य खतांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. रासायनिक खतांमध्ये युरियाचा सर्वाधिक दीड लाख मेट्रिक टन वापरही जिल्ह्यात झाला आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असलेल्या नगर जिल्ह्यात तीन लाख ३० हजार ७७ मेट्रिक टन एवढ्या रासायनिक खतांची विक्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख ४६ हजार २४३ मेट्रिक टन एवढी विक्री झाली आहे. 

खत कंपन्यांकडून घाऊक विक्रेत्यांना खतांची झालेली विक्री (टनांमध्ये)
अहमदनगर - ३३००७७.४०, अकोला - ९०९४३.८०, अमरावती - ११८८३५.९०, औरंगाबाद - ३४६२४३.८५, बीड - १७०२१५.१५, भंडारा - ७९९४१.४५, बुलडाणा - २१११३६.१०, चंद्रपूर - १२४७०९.२०, धुळे - ११३२९७.६०, गडचिरोली - ५२०६५.२५, गोंदिया - ७४७३३.४५, हिंगोली - ५२१३४.७५, जळगाव - ४०४१४७.८०, जालना - २३०६४१.३५, कोल्हापूर - २७४६३१.४५, लातूर - १०८९५८.९०, नागपूर - १५२०३५.७०, नांदेड - ३०३६८९.४५, नंदुरबार - १११६०८.१५, नाशिक - ३०६६६४.२०, उस्मानाबाद - ६३४०२.९०, पालघर - २०९८३.५०, परभणी- ११७३५५.७५, पुणे -२७०३५१.९०, रायगड - ९४७६३.३०, रत्नागिरी - ८९१८.७५, सांगली - २२०८६०.६५, सातारा - १७८३०१.१०, सिंधुदुर्ग - ८२८५.८०, सोलापूर - २४२९१०.७३, ठाणे - ९१७५.७५
 

इतर अॅग्रो विशेष
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...
विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे !...पंढरपूर, जि. सोलापूर : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर...
खरिपाचा पेरा अद्यापही माघारलेलाचनवी दिल्ली ः देशात गुरुवारपर्यंत (ता. १२) खरिपाची...
पंढरीत विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन...अकोला : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात मोठ्या धरणांमध्ये यंदा अधिक साठापुणे : राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटात सुरू...
शाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना...जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव...
शेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोडबुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी...
सेवा कसली, ही तर चक्क लूटबॅंकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील तर...
‘परभणी शक्ती’ने मिळेल ज्वारीला बळआपला आहार हा रिजन अन् सिझन स्पेसिफीक असला पाहिजे...