agriculture news in marathi, Morna river cleanning | Agrowon

अकोल्यातील मोर्णा नदीचा श्वास होणार मोकळा
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

अकोला  ः शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला सध्या जलपर्णी अाणि अस्वच्छतेचे ग्रहण लागले असून, ही नदी स्वच्छ करण्यासाठी शनिवारी (ता.१३) हजारो अकोलेकर सरसावले. नदीला स्वच्छ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत नागरिकांना सहभागी होण्याचे अावाहन केले होते. त्यानुसार या नदीच्या दोन्ही तिरांवर शनिवारी हजारो नागरिकांनी श्रमदानासाठी पुढाकार घेतला.

अकोला  ः शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला सध्या जलपर्णी अाणि अस्वच्छतेचे ग्रहण लागले असून, ही नदी स्वच्छ करण्यासाठी शनिवारी (ता.१३) हजारो अकोलेकर सरसावले. नदीला स्वच्छ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत नागरिकांना सहभागी होण्याचे अावाहन केले होते. त्यानुसार या नदीच्या दोन्ही तिरांवर शनिवारी हजारो नागरिकांनी श्रमदानासाठी पुढाकार घेतला.

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, अामदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, महापालिका, पोलिस प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक संघटना, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक असे हजारो हात ‘मोर्णा’ नदीला स्वच्छ करण्यासाठी सरसावले होते.

सकाळी ८ वाजता मोर्णेच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. एकाच वेळी १४ ठिकाणी सुरवात झाली. जलकुंभी काढण्याचे काम सुरू झाले. मोर्णा नदी जलकुंभी व कचऱ्याने विद्रूप झाली आहे. तिच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसहभागातून नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले.

नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छतेअंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन करण्यात आले होते. मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाने जिल्ह्यातील तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली १४ स्वच्छता पथकांची स्थापना केली आहे. नदीतील जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी कामगार व जेसीबीची मदत घेतली जात अाहे. त्यानंतर काठावरील जलकुंभी नागरिकांमार्फत ट्रॅक्टर व घंटागाडीत भरली जात अाहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...