agriculture news in Marathi, mortgage scheme for nuts ans Betel nut , Maharashtra | Agrowon

काजू, सुपारी, भातासाठी तारण याेजना
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018

काेकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भिवंडी, मुरबाड, शहापूर, महाड, माणगाव, पेण, रोहा, मुरुड या बाजार समित्यांमार्फत काजू, सुपारी आणि भात पिकांसाठी शेतीमाल तारण योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये ३ काेटी १० लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे काजू, सुपारी आणि भात उत्पादकांना निश्चितपणे दिलासा मिळेल. 
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ

पुणे ः काेकणातील शेतकऱ्यांना शेतीमाल तारण याेजनेचा लाभ मिळावा, यासाठी काेकणातील १० बाजार समित्यांमध्ये काजू, सुपारी आणि भात तारणा याेजना पुढील वर्षी राबविण्यात येणार आहे. यासाठी पणन मंडळाच्या वतीने ३ काेटी १० लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. तर काजू तारण याेजनेत यंदा १४ शेतकऱ्यांना ७२ टन तारणातून ७२ लाखांचे कर्ज वितरित केले आहे.    

पणन मंडळाच्या शेतीमाल तारण याेजनेअंतर्गत काजू तारणासाठीचे प्रतिकिलाेच्या दरात २० रुपयांनी वाढ केली असून, हा दर आता १०० रुपये करण्यात आला आहे. तसेच सुपारीचादेखील तारण याेजनेत समावेश करण्यात आला असून, त्याचा दरदेखील १०० रुपये प्रतिकिलाे ठरविण्यात आला आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार काेकणात तारण याेजना राबवली जात आहे.

शेतीमाल तारण ठेवताना त्या दिवशीच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम ६ टक्के व्याज दराने १८० दिवसांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल तत्काळ विक्री न करता पैसे उपलब्ध होतात, तसेच भविष्यात शेतीमालाच्या बाजार भावात होणाऱ्या वाढीचा फायदा मिळतो. 

या याेजनेच्या अंमलबजावणीसाठी काेकण विभागाचे व्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील आणि रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी काजू उत्पादकांसाठी विविध ठिकाणी बैठका घेऊन तारण योजनेबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली.

सदर बैठकीमधील शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामीण भागातील काही गोदामे निश्चित करून सदर गोदामांच्या उपलब्धतेसाठी करार केला, तसेच गोदामांचा विमा काढला. २०१८ च्या मे आणि जून महिन्यामध्ये कोकणातील एकूण १४ शेतकऱ्यांनी ७२.६८ टन काजू बी तारणात ठेवलेली असून, या पोटीबाजार समितीने शेतकऱ्यांना अदा केलेल्या रकमेची प्रतीपूर्ती कृषी पणन मंडळाने बाजार समितीस केलेली आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...