agriculture news in Marathi, Mosambi, Pomegranate rates stable in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात मोसंबी, डाळिंबाचे दर टिकून
सुदर्शन सुतार
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंब, मोसंबीला चांगलाच उठाव मिळाला. मागणी चांगली असल्याने त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. डाळिंबाला सर्वाधिक ७० रुपये प्रतिकिलो आणि मोसंबीला ३० रुपयांपर्यंत दर मिळाला.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंब, मोसंबीला चांगलाच उठाव मिळाला. मागणी चांगली असल्याने त्यांचे दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. डाळिंबाला सर्वाधिक ७० रुपये प्रतिकिलो आणि मोसंबीला ३० रुपयांपर्यंत दर मिळाला.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मोसंबीची आवक रोज ९०० ते एक हजार क्विंटलपर्यंत राहिली. डाळिंबाची आवक एक ते दीड टनापर्यंत राहिली. आठवडाभरात त्यात किरकोळ चढ-उतार राहिला; पण मागणी चांगली असल्याने गेल्या काही दिवसांच्या तुलनेत विचार करता, दरामध्ये थोडीशी सुधारणा झाली. विशेषतः डाळिंबामध्ये चांगली सुधारणा होत आहे.

मोसंबीची आवक उस्मानाबाद, लातूर भागातून झाली, तर डाळिंबाची आवक जिल्ह्यातूनच सर्वाधिक झाली. मोसंबीला प्रतिकिलोसाठी २० ते ३० व सरासरी १५ रुपयांचा दर मिळाला. डाळिंबाला २० ते ७० व सरासरी ३५ रुपये रुपयांपर्यंतचा दर मिळाला. त्याशिवाय लिंबू, पपईलाही मागणी कायम होती; पण त्यांचे दरही काहीसे कमीच राहिले; पण टिकून राहिले.

लिंबूची आवक रोज ४० ते ५० क्विंटल आणि पपईची आवक ५ ते १० क्विंटलपर्यंत राहिली. लिंबूला प्रतिदहा किलोसाठी ६० ते १०० रुपये आणि पपईला ७० ते ८० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय फळभाज्यामध्ये ढोबळी मिरची, हिरवी मिरची आणि गवारची आवक कमीच राहिली. प्रत्येकी २० ते ५० क्विंटलपर्यंत दिवसाची उलाढाल होती; पण दर बऱ्यापैकी राहिले. ढोबळी मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १०० ते २२० रुपये, हिरव्या मिरचीला १०० ते १५० रुपये आणि गवारला २५० ते ४०० इतका दर मिळाला.

कांद्याचे दरही पुन्हा जैसे थे
या सप्ताहात कांद्याची आवकही पुन्हा काहीशी वाढली. कांद्याची आवक रोज १५० ते २०० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे अजूनही कांद्याचे दर टिकून आहेत. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते २८०० व सरासरी २००० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...
तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने...नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे...
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचानागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती...
संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणारपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची...
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची...भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...