agriculture news in Marathi, Mosambi producer in confusion regarding crop insurance, Maharashtra | Agrowon

दुष्काळग्रस्त मोसंबी उत्पादक विमा योजनेबाबत संभ्रमात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पुणे : मोसंबीच्या आंबिया बहरासाठी विमा हप्ते भरलेले, परंतु दुष्काळामुळे बहर न धरलेल्या शेतकऱ्यांनी आंबिया बहराचादेखील हप्ता भरावा की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती तयार झालेली आहे. 

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहरासाठी द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, पेरू, आंबा, लिंबू व काजू यांचा समावेश आहे. त्यासाठी यंदा ३० जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना राबविली जात आहे. राज्यातील डाळिंब, मोसंबी, पेरू, केळी उत्पादकांसाठी आज (ता. ३१) सायंकाळपर्यंत विमा अर्ज भरावा, असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. 

पुणे : मोसंबीच्या आंबिया बहरासाठी विमा हप्ते भरलेले, परंतु दुष्काळामुळे बहर न धरलेल्या शेतकऱ्यांनी आंबिया बहराचादेखील हप्ता भरावा की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती तयार झालेली आहे. 

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहरासाठी द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, पेरू, आंबा, लिंबू व काजू यांचा समावेश आहे. त्यासाठी यंदा ३० जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून ही योजना राबविली जात आहे. राज्यातील डाळिंब, मोसंबी, पेरू, केळी उत्पादकांसाठी आज (ता. ३१) सायंकाळपर्यंत विमा अर्ज भरावा, असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. 

हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०११-१२ राज्यात सुरू झाली. त्यानंतर २०१६ च्या मृग बहरापासून समूह (क्लस्टर) पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यात मृग बहरासाठी पाच व आंबिया बहरासाठी चार समूह तयार करण्यात आले आहेत. 

औरंगाबाद भागातील मोसंबी उत्पादक शेतकरी डॉ. विजय डक म्हणाले, की शेतकऱ्यांनी प्रतिएकरी ३९०० रुपये भरून मृगासाठी विमा हप्ता भरला. मात्र, पाणी नसल्यामुळे आम्ही बहर धरलेला नाही. त्यामुळे आंबिया बहरात पुन्हा विमा भरवा किंवा कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मी स्वतः कृषी विभागाला याविषयी माहिती विचारली असता "तुमचा प्रश्न सुंदर आहे, पण उत्तर आमच्याकडे नाही, असे मला सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आपण जिल्हा अधीक्षक कार्यालयात याबाबत विचारणा केली असता विमा फक्त एकदाच भरता येत असल्याचे सांगितले गेले. मात्र, काही बॅंका दोनदादेखील प्रस्ताव स्वीकारत असल्यामुळे कृषी विभागाने याबाबत सहानुभूतीची भूमिका घेत संभ्रम दूर करावा, अशी मागणी डॉ. डक यांनी केली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी आंबिया बहरात विमा योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची आहे. मात्र, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील, असे सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...