agriculture news in marathi, motiramji lahane project closed, Maharashtra | Agrowon

‘मोतीरामजी लहाने’ प्रकल्प बंद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

मुंबई: ज्या योजनांची जिल्हा आणि राज्यस्तरावर दुरुक्ती होत आहे अशा योजना बंद करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत राबविण्यात येत असलेला स्व. मोतीरामजी लहाने कृषिसमृद्धी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्याऐवजी संबंधित जिल्ह्यात एकात्मिक शेतीविकास संकल्पनेवर आधारित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  

मुंबई: ज्या योजनांची जिल्हा आणि राज्यस्तरावर दुरुक्ती होत आहे अशा योजना बंद करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत राबविण्यात येत असलेला स्व. मोतीरामजी लहाने कृषिसमृद्धी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्याऐवजी संबंधित जिल्ह्यात एकात्मिक शेतीविकास संकल्पनेवर आधारित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  

शेतीतील नापिकी, कर्जबाजारीपणा आणि इतर कारणांमुळे विदर्भ, मराठवाड्यातील चौदा जिल्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त आहेत. यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वंकष कृषी विकासाद्वारे तसेच प्रचलित योजनांच्या एकत्रीकरणाद्वारे पथदर्शी तत्वावर मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी प्रकल्प २०१६-१७ ते १८-१९ या काळात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या समस्यांवर मात करणे आणि घटत्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची आखणी शासनाने हाती घेतली होती. विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्यात २०१८ ते २०१४ पर्यंत का प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी २०१७-१८ पासून सुरू करण्यात आली आहे. 

मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी प्रकल्प आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुळात एकात्मिक शेतीविकास संकल्पनेवर आधारित आहेत. मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी प्रकल्पातील यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश करण्यात आलेला आहे. या दोन्ही प्रकल्पात पात्र असणारे लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातीलच असून दोन्ही योजनांची उद्दिष्टे, घटक आणि अपेक्षित फलनिष्पत्ती समान स्वरूपाची आहे, या पार्श्वभूमीवर शासनाने मोतीरामजी लहाने कृषी समृद्धी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच संबंधित जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ज्या योजनांची जिल्हा आणि राज्यस्तरावर दुरुक्ती होत आहे अशा योजना बंद करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय कृषी खात्याने जारी केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...