agriculture news in marathi, mou for increase investment in cotton field, mumbai, maharashtra | Agrowon

कापूस क्षेत्रात गुंतवणूकवाढीच्या मदतीकरिता सामंजस्य करार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

आजच्या सामंजस्य करारामुळे कापूस क्षेत्रात गुंतवणूक वाढीला मदत होईल, अशी आशा आहे. त्यासोबतच प्रथमच सीएआयने मुंबईत कॉटनग्रीन या ठिकाणी कापूस उत्पादकांच्या प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सीएआयने सव्वा कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना व्यापाराच्या अनुषंगाने पारंगत करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे.
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग.

मुंबई ः कापूस उद्योगाला भेडसावणाऱ्या पतपुरवठा समस्येच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) बुधवारी (ता. ५) येथील बीएसईच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकाराने या कराराला मूर्त स्वरूप आले आहे. यामुळे कापूस क्षेत्रात गुंतवणूकवाढीला मदत होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

या वेळी ‘बीएसई’चे सीईओ आशिषकुमार चौहान, ‘सीएआय’चे अध्यक्ष अतुल गणात्रा, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार तानाजी मुटकुळे, ‘बीएसई’चे समीर पाटील, नीरज कुलश्रेष्ठ आदी उपस्थित होते.

पाशा पटेल यांच्या पुढाकाराने काही दिवसांपूर्वी विदर्भात कापूस उद्योगाशी संबंधित घटकांची, व्यापाऱ्यांची व्यापक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी देशभरातील कापूस प्रक्रिया उद्योजकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विशेषतः कापूस उद्योजकांना भेडसावणाऱ्या पत पुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. डिसेंबर-जानेवारीनंतर पैशाअभावी कापूस व्यापारी बाजारात चांगला कापूस असूनही खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या कापसालाही योग्य दर मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर बीएसई आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातील या सामंजस्य करारामुळे कापूस उद्योगात पत पुरवठ्याचा ओघ वाढेल. त्यामुळे व्यापाऱ्यांची क्रयशक्ती वाढून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

या कराराच्या अनुषंगाने सीएआय आणि राज्य कृषी मूल्य आयोगाकडून व्यापाऱ्यांसाठी एक कार्यपद्धती तयार करून दिली जाणार आहे. याअंतर्गत व्यापार कसा असेल, याची निश्चिती यात करून दिली जाणार आहे. तसेच येत्या महिन्याभरात सीएआय आणि राज्य कृषी मूल्य आयोग राज्यातील मोठ्या कापूस उत्पादकांसोबत, व्यापारी, खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांची एक व्यापक कार्यशाळा आयोजित करणार आहे. या कार्यशाळेसाठी सुमारे पाचशे जण उपस्थित राहतील, असे नियोजन केले जाणार आहे. कापूस उत्पादक ते उद्योजक अशी मध्यस्थमुक्त साखळी करण्यावर यात विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...